होशीयार ! सरकार येतोय....

'सकाळ' मीडिया ग्रुपचे राजकीय विषयावरील स्वतंत्र वृत्तपत्र सप्टेंबर महिन्यात सुरू होत असून,त्याचे नाव 'सरकार' फायनल झाल्याची चर्चा आहे.याबाबत बेरक्याने वृत्तपत्र नोंदणीची अधिकृत वेबसाईट RNI वर 'सरकार' हे नाव सर्च केले असता,'सरकार' नावाची अनेक वृत्तपत्रे अगोदरच नोंदणी झालेली दिसली.त्यामुळे सकाळ मीडिया ग्रुपच्या 'सरकार'च्या मागे - पुढे कोणते तरी जोड अक्षर असण्याची शक्यता आहे.
सकाळ मीडिया ग्रुपचे कृषी विषयावरील 'अ‍ॅग्रोवन' दैनिक सुरू आहे.त्याचप्रमाणे फक्त आणि फक्त राजकीय विषयावरील बातम्या,लेख,स्तंभ आणि इतर बरेच काही कंन्टेट घेवून 'सरकार' येणार आहे.
'सरकार'ची जबाबदारी औरंगाबादहून पुण्याला बदली झालेल्या जयंत महाजन यांच्यावर सोपवण्यात आल्याची चर्चा आहे.त्याचबरोबर 'सरकार'मध्ये कोण कोण राहणार,याकडे लक्ष वेधले आहे.मात्र 'सरकार' कोणत्याही परिस्थितीत
सप्टेंबर महिन्यात  लॉन्च होणार असल्याची चर्चा आहे.
राज्यात 'सरकार' भाजप आणि शिवसेना युतीचे असो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे....मात्र वाचकांचे 'सरकार' सकाळ मीडिया ग्रुप सुरू करत असून,त्याची जय्यत तयारी सुरू आहे.