पुढारीची संपादकीय टीम सलेक्ट,आजपासून ऑफर लेटर वितरीत

 औरंगाबाद - पुढारीच्या औरंगाबाद आवृत्तीसाठी गेल्या शनिवारी आणि रविवारी संपादकीय विभगासाठी मुलाखती पार पडल्यानंतर ४० जणांची संपादकीय टीम सलेक्ट करण्यात आली असून,या सलेक्ट उमेदवारांना आजपासून ऑफर लेटर देण्यात येणार आहेत.
पुढारीच्या औरंगाबाद आवृत्तीची सध्या जय्यत तयारी सुरू आहे.संपादकीय विभाग वगळता सर्व विभागाचे कर्मचारी नियुक्त करण्यात आल्यानंतर गेल्या शनिवारी आणि रविवारी संपादकीय विभागासाठी मुलाखती पार पडल्या होत्या,या मुलाखतीसाठी लोकमतचे आठ,दिव्य मराठीचे १२,सकाळचे चार,पुण्यनगरीचे दोन,म.टा.चे दोन तसेच स्थानिक लोकपत्र,सांजवार्ता,आनंदनगरीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यातून रिपोर्टर ते वृत्तसंपादक अशी ४० जणांची टीम तयार करण्यात आली आहे.या सर्वांना आजपासून ऑफर लेटर देण्यात येणार आहेत.
पुढारीच्या औरंगाबाद आवृत्तीचा गेल्या दहा वर्षात दोनदा प्रयोग फसल्यानंतर आता लांडगा आला रे आला,याप्रमाणे खरंच पुढारी येत आहे.त्याची जय्यत तयारी सुरू आहे.पुण्याहून औरंगाबादला एक प्रिटींग युनिट आणण्यात आले आहे,मात्र आणखी एक नविन प्रिटींग युनिट बसवण्यात येत आहे.शेंद्रा एमआयडीसीमध्ये हे प्रिटींग युनिट बसवण्यात आले आहे.येत्या १ किंवा १६ सप्टेबर रोजी पुढारी औरंगाबाद शहर व जिल्हा,जालना आणि बीड या तीन जिल्ह्यात सुरू होणार आहे.जालना आणि बीडमध्ये पुढारीचे विभागीय कार्यालय राहणार आहे.
औरंगाबाद पुढारीची शहरात १२ ८ अशी २० पाने राहणार आहेत.त्याचबरोबर आठवड्यातून तीन पुरवण्या राहणार आहेत.सध्या निवासी संपादक म्हणून भालचंद्र पिंपळवाडकर आणि युनिट हेड म्हणून कल्याण पांडे काम पहात आहेत.गरज भासल्यास काही दिवसांकरिता विवेक गिरधारी यांना औरंगाबादला बोलावण्यात येणार आहे.
पुढारीला अजून तरी तगडा कार्यकारी संपादक मिळालेला नाही.सकाळचे संजय वरकड यांना या पदासाठी ऑफर देण्यात आली होती,मात्र त्यांनी नकार दिलेला आहे.त्यानंतर जयंत महाजन यांच्या नावाची चर्चा होती,मात्र महाजन सकाळच्या होवू घातलेल्या सरकार या राजकीय वृत्तपत्राच्या तयारीला लागले आहेत.त्यामुळे आता गिरधारीशिवाय पर्याय राहिलेला नाही.गिरधारी औरंगाबाद आल्यास मोठी स्पर्धा होवू शकते,अन्यथा पुढारीची वाटचाल संथ गतीने सुरू राहणार,हे मात्र नक्की.