माणिक मुंढे अखेर
आयबीएन लोकमतमध्ये दाखल झाला. त्याच्याविरोधात त्याचेच एके काळचे ई
टीव्हीतले सहकारी एकत्र आले होते. राजाभाऊ, उशीर, कॉम्रेड ताई, केंटुकी यात
आघाडीवर होते. काहींनी तरी माणिकच्या जुन्या प्रकरणांचा उल्लेख करत
एचआरकडे त्याला घेऊ नये यासाठी विनंती केली होती. धड शिफ्ट लावू न शकणारा
उशीर कार्यक्षमता दाखवण्यासाठी कधी नव्हे तो धडपडू लागला होता. राजाभाऊ आणि
उशीरने माणिकला रोखण्यासाठी एकत्रित कामाला सुरूवात केली होती. ही मंडळी
आयबीएन सुरू झाल्यापासून इथेच आहे. फक्त
टिकून राहिले या एका कर्तबगारीवर मोठ्या पदावर पोहोचले. पण चॅनेलचा टीआरपी
यांना वाढवता आला नाही. आता पर्यंत या चॅनेलमध्ये कोणीही जरा बदल करण्याचा
प्रयत्न केला तर, त्याची खाट घालण्यात आली. खाट हा शब्द यासाठीच इथं
प्रचलित आहे. चॅनेलमध्ये दूरदर्शनच्या पद्धतीने आरामशीर काम सुरू आहे.
त्यामुळे टीआरपी काही वाढत नाही, आणि चॅनेलचा तिसरा नंबर काही हटत नाही अशी
परिस्थिती आहे. कामात बदल करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी आणलेला बाबाही
इथे हतबल ठरला. मात्र चॅनेलचा घसरणारा टीआरपी वाढवण्यासाठी मंदार सर आणि
महेश सर यांनी माणिक मुंढेला चॅनेलमध्ये आणायचंच अशी ठाम भूमिका घेतली.
त्यामुळे आता जुनी खोडं नाराज झाली आहेत. त्यामुळे माणिकच्या मार्गात अनेक
अडचणी येणार. पण कार्यकारी संपादक त्याच्या बरोबर आहेत, ही जमेची बाजू आहे.
त्यामुळे चॅनेलमध्ये काय फरक पडतो हे, लवकरच टीआरपीमध्ये दिसेल.