विनोद काकडे यांचा राजीनामा

औरंगाबाद -महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या  चिफ रिर्पाटर पदावरून दूर करताच,नाराज विनोद काकडे यांनी राजीनामा दिला असून,या राजीनामा पत्रात संपादक सुधीर महाजन आणि युनिट हेड संंदीप बिष्णोई यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.
महाराष्ट्राच्या मानबिंदूमध्ये गेली तीन वर्षे चिफ रिपोर्टर म्हणून काम करणार्‍या विनोद काकडे यांची पुढारीच्या पार्श्‍वभूमीवर चिफ रिपोर्टर पदावरून दूर करण्यात आले आणि नजिर शेख यांना पुन्हा सिटी इन्चार्ज करण्यात आले.काकडे यांना दूर करताना एक तर डेप्युटी न्यूज एडिटर किंवा अन्य पदावर पदोन्नती देणे आवश्यक असताना त्यांना पुन्हा क्राईम रिर्पाटर करण्यात आलेे.फौजदाराचा पुन्हा कॉन्स्टेबल करण्यात आल्यामुळे काकडे कमालीचे नाराज झाले आणि या नाराजीतून त्यांनी राजीनामा दिला.
या राजीनामा पत्रात त्यांनी संपादक सुधीर महाजन आणि युनिट हेड संंदीप बिष्णोई यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.या दोघांच्या छळाला कंटाळून आपण राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे.विशेष म्हणजे हा राजीनामा त्यांनी संपादक सुधीर महाजन यांच्याकडेच दिला आहे.
काकडेंना चिफ रिपोर्टर पदावरून दूर करण्याचा निर्णय सुधीर महाजन यांचा होता की राजेंद्रबाबू यांचा होता,याबाबत लोकमत भवन परिसरात चवीने चर्चा सुरू आहे.