सरकारनामा येतोय...

पुणे - सकाळ मीडिया ग्रुपच्या राजकीय विषयावरील नव्या दैनिकाचे नाव सरकारनामा असून या दैनिकाचा शुभारंभ 1 डिसेंबर रोजी होणार आहे.या बहुप्रतिक्षेत दैनिकाची संपादकीय जबाबदारी जयंत महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कृषी विषयावरील अ‍ॅग्रोवन दैनिक यशस्वी झाल्यानंतर सकाळ मीडिया ग्रुपचे सर्वेसर्वा अभिजीत पवार यांनी राजकीय विषयावर दैनिक काढण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.त्यानंतर या दैनिकाचे नाव सरकार असावे,असे ठरले होतेे.मात्र सरकार नावात काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे  त्यांना सरकारनामा सुरू करावा लागत आहे.
या दैनिकाची तयारी गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे.हे दैनिक अ‍ॅग्रोवन दैनिकाच्या आकाराप्रमाणेच 16 पानी (सर्व पाने रंगित) राहणार असून,त्यात अनेक कंटेन्ट राहणार आहेत.किंमत चार किंवा पाच रूपये राहणार आहे.मुंबई,पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या दैनिकाचा शुभारंभ होणार असून,या नव्या दैनिकाकडे वाचकांचे लक्ष वेधले आहे.