औरंगाबाद - एकीकडे पुढारीने औरंगाबादेत जोरदार मुसंडी मारण्याची तयारी केली असताना,दुसरीकडे पुढारीची हवा काढून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या मानबिंदूच्या बाबूजींनी 'डोंगरधारी'ला फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.त्याचबरोबर लोकमत ते पुढारी (व्हाया सकाळ ) करणार्या रिपोर्टरला 'अभय' देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.दरम्यान,लोकमतमधून बाहेर पडलेला विनोद काकडे पुढारीच्या वाटेवर आहे.
महाराष्ट्राच्या मानबिंदूने कोल्हापुरात पुढारीला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे पलटवार करण्यासाठी पद्मश्रींनी औरंगाबादेत पुढारीला सुरू करण्याचा निर्णय घेतला.गेल्या दहा वर्षात दोनदा प्रयोग फसल्यानंतर तिसर्या वेळी मात्र पद्मश्रींनी जोर लागला आहे.
सुशिल कुलकर्णी आणि मंगेश डोंग्रजकर यांनी ऐनवेळी धोका दिल्यानंंतर पुढारीने हुकमी एक्का काढला.मात्र हा हुकमी एक्काच पळवण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्राच्या मानबिंदूकडून सुरू आहे.यासाठी डोंगधारीला मुंबई आवृत्तीचे संपादकपद,दुप्पट पॅकेज आणि सर्व सुविधा देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचे कळते.जेव्हा डोंगरधारी महाराष्ट्राच्या मानबिंदूकडे चकरा मारत होता,तेव्हा किंमत करण्यात आली नाही,आता औरंगाबादेत पुढारी सुरू होत असताना आमिष दाखवण्यात येत आहे.या आमिषाला डोंगरधारी बळी पडणार का,याकडे लक्ष वेधले आहेे
.
विनोद काकडेे यास लोकमतमधून निरोप
चिफ रिपोर्टर पदावरून दूर करताच विनोद काकडे याने लोकमतचा राजीनामा दिला होता.तो राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे.त्यानंतर काकडेंना शनिवारी निरोप देण्यात आला तर नजिर शेख यास ब्युरोे चिफ करण्यात आले.
दुुसरीकडे काकडे पुढारीच्या वाटेवर आहे.त्यास न्यूज एडिटर (औरंगाबाद शहर) पद देेण्याचा आणि लोकमतपेक्षा दुप्पट पॅकेज देण्याचा पुढारीचा निर्णय झाल्याचे कळते.काकडे हा लोकमतचा विश्वासू व्यक्ती होता.त्यामुळे लोकमतला झटका बसला आहे.त्याचे उट्टे काढण्यासाठी पुढारीमधील एकास अभय देणे सुरू आहे.
पुढारीचा फटका लोकमतला...
पुढारीच्या बातम्या या आक्रमक असतात.कंटेंन्टपण चांगले असतात.त्यामुळे पुढारीचा कॉन्टरसेल चांगला होतो.मराठवाड्यातील लोकांना आक्रमक लिखाणाची आवड आहे.त्यामुळे पुढारी मराठवाड्यातील वाचकांच्या पसंदीस उतरेल आणि त्याचा सर्वाधिक फटका लोकमत,त्यानंतर पुण्यनगरीस बसण्याची शक्यता आहे.