वाचकांना नम्र आवाहन


बेरक्या ब्लॉग नियमित अपडेट होत नाही,कधी कधी महिनाभर अपडेट होत नाही,अश्या तक्रारी वाचकांनी बेरक्याकडे मेलव्दारे केल्या आहेत.
वाचकांच्या या तक्रारी आम्हाला मान्य आहेत,परंतु या वाचकांना आदरपुर्वक सांगू इच्छितो की, सध्या मराठी मीडियात काहीच घडामोडी घडत नाहीत.औरंगाबादेत पुढारी सुरू होत आहे आणि त्या पाठोपाठ एकमत....या दोन नव्या घडामोडी  सोडल्या तर सध्या काहीच नविन नाही.
मराठी मीडियात घडणार्‍या सर्व हालचालीवर बेरक्याचे बारीक लक्ष आहे.राज्यातील सर्व वृत्तपत्रात आणि न्यूज चॅनलमध्ये बेरक्याने आपला सोर्स तयार केला आहे.टाचणी जरी वाजली तरी बेरक्याकडे त्याची पुर्णपणे माहिती येते.याचा अर्थ ऊठसूठ कोणत्याही बातम्या देणे किंवा कोणालाही झोडपून काढणे असा नाही.ज्या बातम्या शंभर टक्के खर्‍या आहेत, वाचकांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेेत,त्याच प्रसिध्द केल्या जातात.
बेरक्या चांगल्याचा साथीदार आणि वाईटांचा कर्दनकाळ आहे.कोणी कोणाला त्रास देवू नये,हाच हेतू आमचा आहेे.
राज्यात सध्या पत्रकारांवर हल्ला करून नंतर खोट्या केसेस दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे.या प्रकरणी प्रत्येक जिल्ह्यात वकिल सेल तयार करून पत्रकारांना कायदेशीर साह्य करण्याची योजना सध्या सुरू आहे.त्यासाठी काही पत्रकार पुुढे आले आहेत.
पत्रकार संरक्षण कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा,यासाठी सर्व पत्रकारांनी वज्रमूठ आवळणे गरजेचे आहे.पत्रकारांतील आपापसातील मतभेदामुळे भ्रष्ट लोक पत्रकारांना टार्गेट करत आहेत.पत्रकारांनी एकजूठ दाखवली नाही तर पत्रकारितेचे क्षेत्र धोक्यात येणार आहे.तेव्हा सर्व पत्रकारांना आवाहन आहे की,एकत्र या....कोणत्या पत्रकारांवर अन्याय झाला तर आपली ताकद दाखवा अन्यथा आपले भविष्य अवघड आहे....
- बेरक्या उर्फ नारद