औरंगाबाद - सतत कोणत्या ना कोणत्या अडचणीमुळे पुढारीचे लॉचिंग लांबणीवर पडत आहे.दिवाळी पाडव्यादिवशी सुरू होणारा पुढारीचा पाळणा पुन्हा लांबणीवर पडला आहे.त्यामुळे पुढारी टीमचा उत्साह मावळत चालला आहे.
गेल्या दहा वर्षात दोनदा प्रयोग फसल्यानंतर तिसर्या वेळी पुढारी नक्की सुरू होेणार,हे शंभर टक्के सत्य असले तरी पुढारीच्या अडचणी दूर व्हायला तयार नाहीत.प्रिटींग मशिन बरोबर काम करत नसल्यामुळे पुढारीच्या मॅनेजमेंटने लॉचिंग पुढे ढकलले आहे.
पुढारी कसल्याही परिस्थितीत दिवाळी पाडव्यादिवशी सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या.परंतु प्रिटींग मशिन साथ देत नाही.त्यामुळे दिवाळीचा मुहुर्त पुढारीला साधता आला नाही.लॉचिंग लांबणीवर पडल्याने कोल्हापूरहून आलेली टीम परत गेली आहे तर डोंगरधारी पुन्हा मुंबईला गेले आहेत.समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार यांचा पाय अजूनही दुरूस्त झालेला नाही.नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने ही म्हण पुढारीला लागू पडत आहे.
प्रिटींग मशिनमध्ये सतत व्यत्यय येत असल्यामुळे नविन प्रिटींग युनिट खरेदी करण्याचा निर्णय मॅनेजमेंटने घेतल्याचे कळते.तोपर्यंत अन्य वृत्तपत्राच्या प्रिटींग युनिटवर छपाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यासाठी दिव्य मराठीबरोबर बोलणी सुरू आहे.दिव्य मराठी आपल्या प्रतिस्पर्धी दैनिकास अंक छापून देणार का,याकडे लक्ष वेधले आहे.