मी मराठीमध्ये पोरखेळ सुरू


मुंबई - मी मराठी न्यूज चॅनलचा मालक महेश मोतेवार चिटफंड प्रकरणी अटक झाल्यापासून या चॅनलला चांगलीच घरघर लागली आहे.रवी आंबेकर,तुळशीदास भोईटे गेल्यानंतर या चॅनलचे सर्व बुलेटिन बंद झाले होतेे,मात्र लाइव्ह इंडियाच्या विजय शेखर यांनी कसेबसे हे चॅनल सुरू केले आहे,इनपूटची जबाबदारी राहूल पहुरकर तर आऊटपूटची जबाबदारी सोनम ढेपे- मोरे पहात आहेत.सुरूवातीस या दोघात चांगलीच मैत्री होती.
या चॅनलमध्ये सध्या पोरखेळ सुरू आहे.ज्यांना काहीच अनुभव नाही अश्या रिपोर्टर आणि अँकरवर डोलारा सुरू आहे.राहूल पहुरकर यांनी रात्रीच्या विशेष न्यूज बुलेटिनचे अँकरिंग सुरू केले होते.मात्र त्यास अँकरिंग  जमत नसल्यामुळे ते थांबवण्यात येवून एका नवख्या अँकरवर ती जबाबदारी देण्यात आल्यानंतर पहुुरकर आणि सोनम ढेपे -मोरे यांच्यात मोठी ठिणगी पडली आहे.
राहूल पहुरकर याने एका व्हिडीओ एडिटरशी मोेबाईलवरून बोलताना सोनम ढेपे -मोरे तसेच अनेकांबद्दल मुक्ताफळे उधळली आहेत.त्याची ऑडियो क्लीपच बेरक्याच्या हाती लागली आहे.या संभाषणामध्ये पहुरकर यांनी विजय शेखर यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधाने केली आहेत.तसेच सोनम ढेपे -मोरे यांच्याबद्दल वाईट विधाने केली आहेत.त्यामुळे या दोघांत आणखीच मतभेद वाढले आहेत.
दुसरीकडे मी मराठीच्या अनेक जुन्या रिपोर्टरना काढून टाकण्यात आले आहे.काम करायचे असेल तर फुकट करा अन्यथा काम सोडा म्हटल्यामुळे अनेकांनी काम सोडले आहे.दिवसभरात चार ते पाच बुलेटिन सुरू आहेत.रिपीट त्याच बातम्या फिरवल्या जात आहेत.केवळ नावापुरते हे चॅनल सुरू आहे.त्याचबरोबर हे चॅनल विक्रीस काढण्यात आले आहे.मात्र काही कोटी रूपये मोजून हे चॅनल विकत घ्यायला कोणीही पुढे येत नाही.मोतेवार सुटेपर्यंत मी मराठीचे बाराच वाजणार आहेत.