पुढारीने अखेर हुकमी एक्का काढला...

औरंगाबाद - पुढारीचे समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार हे गेल्या दहा दिवसांपासून आजारी पडले आहेत.त्यांच्या पायाला दुःखापत झाल्याचे वृत्त आहे.त्यामुळे पुढारीच्या औरंगाबाद आवृत्तीचे काम पुन्हा रखडले होते.अखेर पुढारीने हुकमी एक्का काढत विवेक गिरधारी यांना मुंबईहून औरंगाबादला पाठवले असून,गिरधारी औरंगाबादेत दाखल झाले आहेत.त्याचबरोबर कोल्हापूरचे सहयोगी संपादक शिवाजी जाधव यांनाही काही दिवसांसाठी औरंगाबादेत पाठवण्यात आले आहे.एकंदरीत घडामोडीवरून पुढारी दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर किंवा तत्पुर्वी सुरू होण्याची शक्यता आहे.
पुढारीच्या औरंगाबाद आवृत्तीचा प्रयोग गेल्या दहा वर्षात दोनदा फसल्यानंतर यावेळीही अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या.सुशिल कुलकर्णी आणि मंगेश डोंग्रजकर यांनी नकार दिल्यांनतर निवासी संपादकपद न भरता पुढारीने विवेक गिरधारी यांना मुंबईहून औरंगाबादेत पाठवले आहे.गिरधारी हे मूळचे औरंगाबादचे असून,कामात बापमाणूस आहे.त्यांच्या फटकळ स्वभावामुळे अनेकजण दुःखावले असले तरी अंकाचे लेआऊट,बातम्यांची जाण आणि कोणता विषय कोणत्या वेळी हाताळावा यात ते तरबेज असल्यामुळे पुढारीला आता चांगलाच रंग भरणार आहे.त्यामुळे औरंगाबादेत काही दिवस तरी प्रतिस्पर्धी दैनिकाबरोबर पुढारीची स्पर्धा दिसणार आहे.गिरधारी आता औरंगाबादला किती दिवस थांबणार,यावर बरेच काही अवलंबून आहे.
पुढारीने संपूर्ण मराठवाड्यात दोनशे लोकांची टीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात जिल्हा कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.जिल्हा प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले असले तरी प्रत्येक जिल्हा कार्यालयात टीम आणि यंत्रणा अपुरी आहे.सध्या औरंगाबाद शहर आणि जिल्हा,फार फार तर जालना आणि बीडमध्ये औरंगाबाद आवृत्तीचा अंक दिसेल.मराठवाड्यात सर्व ठिकाणी अंक देण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील.तेवढा पैसा ओतण्याची तयारी पद्मश्रींनी केली आहे.
पुढारीचे औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक सुंदर लटपटे हे आक्रमक लिखाण करण्यात माहीर आहेत.मात्र तेवढे स्वातंत्र्य पुढारीने द्यायला हवे.आक्रमक लिखाण केले तर पुढारीला बाजारात किंमत राहणार आहे.त्याचबरोबर सर्वांपेक्षा वेगळ्या बातम्या दिल्या तरच पुढारी मराठवाड्यात भारी होईल अन्यथा एका दैनिकात भर पडली,ऐवढेच म्हणावे लागेल.पुढारीचा सर्वाधिक फटका पुण्यनगरीस बसण्याची शक्यता आहे.


पुढारी काढणार हुकमी एक्का हे वृत्त बेरक्याने २८ ऑगस्ट रोजी दिले होते .... हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे ...