पुढारी सुरु होण्याआधीच जालना येथील जिल्हा प्रतिनिधी सुशीलकुमार वाठोरे यांनी राजीनामा दिला आहे. वाठोरे हे जालना येथे गेल्या चार- पाच वर्षांपासून पुढारीसाठी काम करीत होते. त्यांना पुढारीने कार्यालय सुरु करून दिले होते. त्यांच्यामार्फत जालन्याच्या एमआयडीसीतील काही जाहिरातीही पाठविण्यात येत होत्या. मात्र. गेल्या पाच - सहा वर्षांपासून काम करणाऱ्या वाठोरे यांना कायम ठेवून त्यांना काटशह देण्यासाठी पुढारीचे औरंगाबाद येथील युनिट हेड कल्याण पांडे यांनी त्यांच्या मर्जीतील बीडचा लोकप्रश्नचे काम करणाऱ्या सुहास कुलकर्णी यांना अचानक सेम पोस्टवर जालना येथे नेमणूक केली. त्यामुळे वाठोरे हे दुखावले गेले होते. त्यातच त्यांनी पुढारीचा राजीनामा देऊन त्यांनी देशोन्नतीचे काम सुरु केले.
पुढारीच्या कोल्हापूरच्या व्यवस्थापनाने सलेक्ट केलेल्या एकाही उमेदवाराला युनिट हेड कल्याण पांडे यांनी जालना येथे घेतलेले नाही. उलट मुलाखती न दिलेल्या मर्जीतील सुहास कुलकर्णी आणि त्यापूर्वी महेश कुलकर्णी यांना घेतले आहे.
जाता - जाता
औरंगाबाद - बेरक्याचे भाकीत खरे ठरले ः लोकमतमधून बाहेर पडलेले विनोद काकडे पुढारीमध्ये जॉईन,सिटी न्यूज एडिटर म्हणून पदभार स्वीकारला...