लोकमतमध्ये सुधीर यांची महाजनी ...

लोकमतचे वैजापूर तालुका रिपोर्टर विजय गायकवाड हे गेल्या ११ वर्षांपासून लोकमत मध्ये कार्यरत होते ,पण संपादक सुधीर महाजन यांच्या त्रासाला कंटाळून शेवटी राजीनामा दिला असून त्यांनी राजीनामा पत्रात काय लिहिले आहे ते वाचा ...



  To
आदरणीय राजेंद्रबाबु दर्डा सर
एडिटर इन चिफ, लोकमत समूह
   जवळपास गेल्या ११ वर्षांपासून मी वैजापूर तालुका रिपोर्टर म्हणून कार्यरत आहे. परंतु संपादक सुधीर महाजन यांच्या हेकट व मनमानी कारभाराचा अक्षरशः कळस झाला आहे. गेल्या दीड ते दोन वर्षात महाजनांनी माझी मुस्कटदाबी करून माझे व्देषभावनेने खच्चीकरण केले. याबाबत मी आपणास वारंवार संदेश देवून कळविले आहे. त्यामुळे आपणास हे सर्व माहितीच आहे. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीसाठी मला बोलाविण्यात आले नव्हते. याशिवाय सखीमंच सदस्य नोंदणीच्या छापून आलेल्या जाहीरातीमध्ये माझे हेतुपुरस्सर नाव टाळण्यात आले. महाजनांच्या या 'कर्तृत्वामुळे' मी थोडा व्यथित झालो खरा परंतु यात महाजनांची वैचारिक 'पातळी' किती आहे हे कळून आले. संपादकासारख्या पदावर बसलेल्या व्यक्तीने माझ्यारख्या शेवटच्या घटकाशी अशा सूड व आकसबुध्दीने वागावे ही बाब निश्चितच शोभणारी नाही.  केवळ स्वतःमध्ये असलेल्या पराकोटीच्या अहंकारामुळे माझा बळी देण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. महाजनांनी माझ्याबाबत आपणाकडे चुकीचा अहवाल दिला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर आपणाकडे माझ्याबाबत नेहमीच नकारात्मक बाबीच सादर केल्या. त्यामुळे महाजनांचे माझ्याबाबत असलेले 'विशेष' प्रेम हे व आमच्या दोघांमधील असलेले 'मधुर' संबंध पाहता मी आता थाबंणेच योग्य होईल असे माझे वैयक्तिक मत आहे. महाजनांना लोकमत वार्ताहर असण्यापेक्षा त्यांना 'घरगडी' असणे जास्त अपेक्षित आहे. ते माझ्याकडून शक्य नाही. त्यामुळे मी केवळ महाजनांच्या ञासाला कंटाळून आजपासून रितसर लोकमतसाठी काम करणे थांबवित आहे. आता काहीतरी नाविन्याची आस आहे.  आपण आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपला कायम ऋणाईत राहिल.
धन्यवाद.... !💐💐🙏🏻🙏🏻
                                        आपला
                              विजय गायकवाड, वैजापूर
माहितीस्तव-
मा. सुधीर महाजन, संपादक लोकमत
मा. चक्रधर दळवी साहेब, संपादक लोकमत