औरंगाबादेत अखेर पुढारी सुरु झाला , परंतु शाहू
महाराजांचा वारसा सांगणाऱ्या पुढारीत पेशवाई अवतरल्याचे चित्र सद्या
पाहायला मिळत आहे.युनिट हेड कल्याण पांडे यांच्या हेकेखोर स्वभावामुळे
जाहिरात
,वितरण व संपादकीय विभागात असंतोषाचे वातावरण आहे.मीच सर्व काही अशा
अविर्भावात पांडेजी वागत असून त्यांनी आता व्यवस्थापकीय संपादक योगेश
जाधव व
मुख्य व्यवस्थापक नवल तोष्णीवाल यांनी घेतलेल्या निर्णयांनाही केराची टोपली
दाखवत आहेत.
दि.१६ जानेवारी रोजी योगेश जाधव व नवल तोष्णीवाल औरंगाबादला आले होते.त्यांनी यावेळी विविध पदांसाठी १७ जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या,त्यात त्यांनी बाळासाहेब लिंगायत व इतर ५ जणांची निवड करून त्यांना जॉईन करून घेण्याचे सांगितले होते,परंतु जाधव व तोष्णीवाल परत गेल्यानंतर कल्याण पांडे यांनी मालकाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत पुढारीचा सर्वेसर्वा मीच आहे,अशी टर्रेबाजी सुरु केली आहे.
याशिवाय वितरण व्यवस्थापक अनिल सावंत व कल्याण पांडेची वितरण विभागात जागा भरण्यावरून तू ..तू ..मैं ..मैं झाल्याचेही समोर आले आहे.जाहिरात विभागात सुद्धा सावळा गोंधळ सुरु आहे. काही दिवसापूर्वी कार्यकारी संपादक सुंदर लटपटे व पांडे यांच्यातही चांगलीच बाचाबाची झाल्याचे वृत्त आहे.