टी.व्ही.जर्नलिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीचा वाद धर्मादाय आयुक्त कार्यालयात


मुंबईच्या टी.व्ही.जर्नलिस्ट असोसिएशनच्या निवडणुकीचा वाद
धर्मादाय आयुक्त कार्यालर्यात पोहचला आहे, त्यावर विद्यमान कार्यकारिणीने खुलासा करणारे पत्र प्रसिद्ध केले आहे.
काय आहे खुलासा...
माननीय सदस्य
आपणास माहिती देणे आणि वस्तुस्थिती सांगणे आमचे कर्तव्य आहे.आपण आपली  संघटना वाढवण्यासाठी खुप परिश्रम घेतले आहेत.मोठ्या मेहनतीने ही संघटना आपण या टप्पयापर्यंत आणून ठेवली आहे. टीव्ही जर्नलिस्ट ही संघटना आता चांगल्या प्रकारे काम करते आहे आणि पारदर्शकही काम करते आहे. मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रात ही संघटना लोकप्रिय झाली आहे. सगळ्या वरिष्ठांशी बोलून,त्यांचे मार्गदर्शन घेउन ही संघटना आपण पुढे नेत आहोत.
आपल्या संघटनेच्या निवडणुकीचा वाद धर्मादाय आयुक्त यांच्या समोर सुनावनीसाठी आला आहे. कमलेश सुतार यांनी हा वाद कोर्टात नेला आहे. त्यामुळे खरं काय आणि खोटं काय हे आपणा पर्यंत पोहचवणं हे आम्ही कार्यकारिणी म्हणून आमचं कर्तव्य समजतो.
2 ऑक्टोबर 2016 रोजी मागच्या कार्यकारिणीने संस्थेची निवडणुक आणि वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम), 17 ऑक्टोबर 2016 रोज़ी घ्यायच्या ठरवून निवडणुकीसाठी मुख्य निवडणुक अधिकारी म्हणून नियुक्त केला. निवडणुक आणि वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) या नियमानुसार घ्या अशा स्पष्ट सूचना त्यांना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी 12 ऑक्टोबर 2016 रोजी निवडणुक घोषित केली आणि वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही 17 तारखेला घ्या असे सांगितले. निवडणुका घोषित करून नियमाप्रमाणे  कार्यकारणीने  सगळे अधिकार त्यांना दिले. पण निवडणुक अधिका-यांनी निवडणुका घेताना अत्यंत बायस आणि गैरप्रकार करून निवडणुक घडवून आणली.
1 उमेदवारांचे अर्ज केवळ मधले नाव नाही म्हणून बाद केले
2 उमेदवारी अर्ज दरवाजा बंद करून ते सर्वांसमोर स्कुटीनी न करता बाद केले
3 उमेदवारी अर्ज किरकोळ कारणासाठी बाद केले
4 उमेदवारांच्या प्रश्नांना किंवा त्यांना हवी असलेली माहीती देण्यासाठी उपलब्ध राहीले नाहीत
5 उमेदवारी अर्ज बाद करून ते कुणालाही न सांगता स्वत:च्या घरी नेले अक्षरश: पळवून नेले ( उमेदवार त्यांना प्रश्नं विचारत होते तेव्हा ते पळून गेले )
5 तब्बल 27 अर्ज बाद करून केवळ त्यांना हव्या असलेल्या काही लोकांचे अर्ज ग्राह्य धरून त्यांना हव्या त्या पदावर निवडुन आल्याचे जाहीर केले
6 एका झी न्युजच्या रिपोर्टरला तु तीन फॉर्म भर, एक भरून दे आणि बाकी दोन वर सह्या कर आम्ही पद टाकतो असे सांगून निवडणुक धडवून आणली. ( त्या उमेदवारांने ही माहीती आपले जेष्ठ निमंत्रित सदस्यांच्या कानावरही, ही माहीती दिली आहे)
7 कार्यालयीन कर्मचारी याला सदस्यांकडून धमक्या येत आहेत असे सांगून कोणत्याही धमक्या किंवा कोणताही तणाव नसताना अर्ज घरी घेउन गेले
10 माजी महासचिव यांच्यावर दबाब आणून त्यांना हवे त्या पद्धतीने निवडणुक पार पडून वातावरण खराब करण्याचा प्रयत्नं केला.
11 उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारखेच्या दिवशी कार्यालय उघडे न ठेवता परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेतले
हा सर्व प्रकार अत्यंत चुकीचा आणि घटनेनुसार नाही. निवडणुक अधिकारी हे आपल्या संस्थेचे अनेक वर्ष महासचिव राहीले आहेत. ते प्रत्येक सदस्याला ओळखतात, तरीही हा प्रकार झाला. 
ही सर्व प्रक्रीया झाल्यानंतर ज्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले त्यांनी रितसर त्यांच्याकडे तक्रार केली. पण त्याला निवडणुक अधिका-यांनी योग्य उत्तर दिले नाही. त्यामुळे अनेक सदस्यांनी ही निवडणुक रद्द व्हावी अशी मागणी केली. त्यानुसार एजीएम मध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आला. आपल्या संघटनेच्या एजीएममध्ये या बाबत सविस्तर चर्चा झाली. अर्ज कसे बाद झाले, कोणते घोळ झाले, निवडणुक कशी बायस झाली यावर सर्वांनी आपली मते ठेवली. मुख्यनिवडणुक अधिकारी यांनाही त्यांची बाजू मांडू देण्यात आली. मुख्यनिवडणुक अधिकारी यांनी बाकी इतर सहाय्यक निवडणुक अधिकारी यांकडेही चुकीची माहीती देऊन निवडणुका पार पडल्याचे एजीएम बैठकीत स्पष्ट झाले. या बैठकीत आपले माननीय निमंत्रित सदस्य साहील जोशी, जितेंद्र दिक्षित हे ही उपस्थित होते, सर्वांच्या समोर चर्चा झाली. दिक्षित यांनीही तांत्रिक चुका महत्वाच्या न मानता निवडणुकीत प्रत्येकाला त्याचा हक्क मिळायला हवा होता, त्याचा अधिकार हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे सांगून ही निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणुका घ्याव्यात असे सांगितले. एजीएम मध्ये यावर मतदानही झाले. त्यात बहुमतांने पुन्हा निवडणुका घेण्याचे ठरवण्यात आले. माननीय जितेंद्र दिक्षित यांनी एजीएम समोर निवडणुक अधिकारी म्हणून संघटनेचा सदस्य नको बाहेरच्या तटस्थ व्यक्तिला मुख्यनिव़डणुक अधिकारी म्हणून नेमावे असा प्रस्ताव ठेवला तो सर्वानुमते मान्य करण्यात आला. दिक्षित यांनी शिवदासानी आणि जतीन देसाई यांची नावे सुचवली, त्यानुसार महिन्याभरात  पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या. त्यात सर्वांना भाग घेण्याचा अधिकार होता. पण कमलेश सुतार आणि काही लोकांनी यात भाग घेतला नाही आणि इतरांनाही भाग घेउ नका असे सांगितले असे समजते आणि संस्थेची बदनामी इतर वॉटस अँप ग्रुपवर करत राहीले. आम्ही त्या प्रकाराकडे बिलकुल लक्ष दिले नाही कारण आपण सर्व कायदेशीर बाजू पाहुन प्रक्रीया केली आहे.
मित्रांनो संघटनेच्या कारभार अत्यंत खेळीमेळीने चालला असताना काही लोकांनी विनाकारण संघटनेच्या दारात पोलिसांना पाचारण केले, संघटनेला कोर्टात नेले. ही बाब अत्यंत दुख:दायक आहे. आपण संस्थेचे सन्माननीय सदस्य आहात, आपणाकडेही ही मंडळी येतील आणि खोटी माहीती सांगून तुमच्या कडून कोर्टात सादर करण्यासाठी अफिडेव्हीटवर सह्या मागतील. तुम्ही सह्या करू नका असे आमचे बिलकुल म्हणणे नाही, पण सही करताना आपण ही सर्व बाजू लक्षात घ्या. जी निवडणुक बायस आणि बेकायदेशीर रित्या झाली तीचे सर्मथन करू नये असे आम्हाला वाटते. 
आपणास आणखी काही माहीती हवी असल्यास आपण जरूर संपर्क करा सर्व माहीती द्यायची आमची तयारी आहे, नव्हे माहीती घेण्याचा तुमचा अधिकार आहे...कुणी तुम्हाला खोटी माहीती देउन फसवू नये यासाठी हा पत्रप्रपंच.
कारण तुम्ही चुकीचे अफीडेव्हीट सादर केले तर तो बेकायदेशीर कामाला सहकार्य केले असा त्याचा अर्थ होईल, तुम्ही सविस्तर सर्व माहीती घ्या आणि निर्णय घ्या ही विनंती.

आपले स्नेहांकित
टीव्हीजेए कार्यकारिणी