बेरक्याचे सातव्या वर्षात पदार्पण

बेरक्या ब्लॉग सुरू होवून आज बरोबर सहा वर्षे पुर्ण झाली.21 मार्च 2011 सुरू झालेल्या बेरक्या ब्लॉगने सहा वर्षात 45 लाख 18 हजार 833 हिटस् चा टप्पा पार करून मराठी ब्लॉग विश्‍वात इतिहास रचला आहे.बेरक्या ब्लॉगचे सातव्या वर्षात यशस्वीरीत्या पदार्पण झाले आहे.
मराठी मीडियाचे गॅझेट, मराठी मीडियाचे पीटीआय म्हणून बेरक्याचा अनेकांनी गौरव केला आहे. बेरक्यावर आलेली बातमी शंभर टक्के सत्य असते हे सांगण्यासाठी आता कोण्या भविष्याकाराची गरज नाही.बेरक्याचे वाचक न्यूज पेपर,न्यूज चॅनल आणि बेव मीडियातील सर्व कर्मचारी तसेच वृत्तपत्रांचे मालक सुध्दा आहेत.इतकेच काय तर पत्रकारितेचे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, पोलीस आणि प्रशासनातील कर्मचारी हे पत्रकारितेच्या दुनियेत नेमके काय चालले आहे म्हणून बेरक्या ब्लॉग वाचत असतात.
बेरक्या हा कोणत्याही पत्रकाराचा शत्रू नाही,प्रवृत्तीच्या विरोधात आहे.चांगल्या पत्रकारांच्या बाजूने बेरक्या नेहमीच उभा राहिला आहे.कोणी कोणावर विनाकारण अन्याय करू नये,ही बेरक्याची भूमिका आहे.तसेच मराठी मीडियातील चालू घडामोडी,नविन काय येत आहे याची माहिती बेरक्याने जलदगतीने वाचकांपर्यत पोहचवली आहे.
बेरक्याला बातम्या कश्या कळतात हा संशोधनाचा विषय झाला आहे.बेरक्या नेमका कोण आहे,याचीही चर्चा होत असते,पण बेरक्याने नावापेक्षा कामाला नेहमी महत्व दिले आहे.
असो, बेरक्याला सहकार्य करणार्‍या सर्व पत्रकारांचे मनःपुर्वक आभार...वाचकांचेही आभार...आपण आहात म्हणून बेरक्या आहे...
सर्वांचे आभार....

बेेरक्या उर्फ नारद...