धनंजय लांबे लोकमतच्या वाटेवर

औरंगाबाद - सामना, दिव्य मराठी करून  महाराष्ट्र टाइम्स मध्ये काही काळ घालवल्यानंतर धनंजय लांबे लोकमतच्या वाटेवर आहेत. ते आज सायंकाळी लोकमतचे औरंगाबाद सिटी एडिटर म्हणून पदभार स्वीकारतील असे सांगण्यात आले.
दिव्य मराठी आणि महाराष्ट्र टाइम्स मध्ये निवासी संपादक म्हणून काम केलेल्या  धनंजय लांबे यांना  लोकमतमध्ये सिटी एडिटर पदावर काम करावे  लागत आहे, हे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लांबे पुढारीच्या कार्यकारी संपादक पदासाठी इच्छूक होते, परंतु तेथे संधी न मिळाल्यामुळे लोकमतमध्ये सिटी एडिटर म्हणून जॉईन होत  आहेत.
औरंगाबादेत पुढारी सुरु होताच लोकमतने विनोद काकडे यांना चीफ रिपोर्टर पदावरून हाटवून नजीर शेख यांना पुन्हा संधी दिली होती,त्यामुळे काकडे पुढारीत सिटी एडिटर म्हणून जॉईन झाले, आता नजीर शेख यांच्या डोक्यावर लांबे याना सिटी एडिटर म्हणून बसवण्यात येत असल्यामुळे नजीर शेख नाराज झाले असून नाराज नजीरची काय भूमिका राहणार, याकडे लक्ष वेधले आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र टाइम्सची औरंगाबाद आवृत्ती  जळगाव प्रमाणे बंद होणार असल्याची अफवा पसरली असून, त्यामुळेच लांबे एक पाऊल  मागे येत असल्याची  चर्चा आहे, अन्य १८ ते २० कर्मचारीही   दुसरीकडे संधी शोधत असल्याची चर्चा पसरली आहे .