मुंबई-
एकीकडे सोशल मीडियावर ABP माझा बद्दल टीकेची झोड उठली असताना, याच
चॅनेलमधील टेक्निकल डिपार्टमेंटमधील प्रचंड आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे.
या प्रकरणी टेक्निकल डिपार्टमेंटचे हेड गजानन गुजर, त्याचे बंधू संजय गुजर
आणि अन्य चौघांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
ABP माझा मध्ये जो टेक्निकल डिपार्टमेंट आहे,त्याचे हेड गजानन गुजर आहेत. त्यांचे बंधू संजय गुजर त्याच्या हाताखाली काम करत होते. या गुजर बंधूंनी स्वतःची कंपनी स्थापन करून ABP माझाच्या टेक्निकल डिपार्टमेंटला लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा करून त्याची अव्वाच्या सव्वा बिले उचलली. हे करत असताना कंपनीला अंधारात ठेवले होते. बाहेरून साहित्य खरेदी करण्याऐवजी गुजरांनी लाखोंची बिले उचलली.

या
गैरव्यवहाराची कुणकुण कंपनीला लागताच गेली चार महिने त्याची चौकशी सुरु
होती' अखेर मार्च एण्ड गुजर बंधूंचा अखेरचा दिवस ठरला. गुजर बंधूसह एकूण सहा जणांना कंपनीने नारळ दिला आहे.
दुसरीकडे
कंपनीत कॉस्ट कटिंगची चर्चा रंगली आहे. गेल्या दहा वर्षात प्रथमच कंपनीने
कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला असून अनेकांवर टांगती तलवार आहे.त्यामुळे
दोघेजण अगोदरच BBC मराठीमध्ये लग्गा लावून ठेवला आहे. काहींनी शोध मोहीम
सुरु केली आहे.
दुसरे असे की, येनकेन कारणामुळे ABP
माझामध्ये मोठी गळती लागली आहे.माणिक मुंढे, प्रसन्न जोशी, निलेश खरे हे
बिनीचे कलाकार मागेच निघून गेल्यानंतर आता मयुरेश कोन्नूर आणि जान्हवी
मुळे BBC मराठीच्या वाटेवर आहेत. काही अँकरनी आताच शोधमोहीम हाती घेतली
आहे. त्यामुळे ABP माझासाठी येणारा काळ कठीण असणार आहे.