सध्या जे काही मराठी
माध्यमात सुरु आहे, ते पाहिले की या कल्पना दारिद्र नारायणचे करावयाचे काय
असा प्रश्न पडू लागला आहे. अगदी मेन स्ट्रीम प्रवाहातही हे दारिद्र नारायण
प्रचंड प्रमाणात जाणवत असून यामुळे वाचकांना फार काही नवे मिळत नसल्याचे
दिसते. अनेक ठिकाणी संपादकांना बिझनेसच्या गणितात अडकविल्याने
त्यांच्याकडून नवे काही होताना दिसत नाही तर डेस्कवरील मंडळीही निव्वळ
पाट्या टाकण्याचे उद्योग करत असल्याने तोच तोच रटाळपणा माध्यमात आलेला
दिसतो. आपल्याकडच्या बहुतांश
साहित्यिकांनी इंग्रजी लिटरेचरची कॉपी मराठीत करुन फार काही वेगळे केल्याचा
आविर्भाव आणला, बॉलिवूडमध्ये साऊथवाल्यांची कॉपी होते तसेच मराठी
वृत्तवाहिन्याही इंग्रजी वाहिन्यांची कॉपी करताना दिसतात. आपल्या
प्रतिभेच्या जोरावर इंग्रजी वाहिनीत स्क्रीनकर नवी एखादी फ्रेम तयार झाली
रे झाली की तीची कॉपी मराठीत झालीच म्हणून समजा.. मधल्या काळात स्टुडीओच्या
रचनाही बदलत गेल्या..तेच मराठी वृत्तपत्र सृष्टीतही सुरु असते. सध्या
इकॉनॉमिक्स टाईम्समध्ये काही व्यक्तींचे फोटो हे स्केच स्वरुपात वापरण्यास
सुरुवात झाली की मटा ने त्याची कॉपी केलीच.. याच पंक्तीतील काही दैनिके आता
व्यंग चित्राचा वापर खुबीने करु लागली आहेत. परंतु हे वास्तविक या पुर्वीच
घडायला हवे होते. आर्टिस्ट आणि उपसंपादकही याला अपवाद नाहीत. सब हेडिग आणि
पॉईंटर या दोन्हीच्या पलीकडे ते जाताना दिसत नाही, आता कुठे कॅलिग्राफीचा
वापर होतोय परंतु त्यातही जिवंतपणा आजिवात नाही. कॅलिग्राफीत शब्द बोलतात
परंतु आपल्या मराठी माध्यमातली लीपी बोलायची दुरच नीट अक्षरांचा अर्थही
लागत नाही..आपले आर्टिस्ट हे एकमेकांचे शिकूनच बिचारे वाट काढत असतात
त्यांनी कलेचे नीट शिक्षण घेतलेले नसते हे खरे असले तरी ते प्रतिभेला चालना
देताना दिसत नाहीत..आणि मुळात पानांचा लोडच ईतका की प्रतिभा असली काय नसली
काय मॅनेजमेंटला पानांशी देणे घेणे असल्याने पाट्या टाकायचे उद्योग सुरु
आहेत. रिर्पोटिंग स्टेजवर हीच स्थिती आहे. इन्व्हेस्टीगेटिव्ह टिम असो की
आणखी काही संशोधनात्मक कामे होत नाहीत..मिड डे किंवा मिरर च्या जवळपासही
फिरकताना दिसत नाहीत याबद्दल कुमार केतकरांपासून ते उत्तम कांबळेंपर्यंत
खंत व्यक्त करताना दिसतात. मेन स्ट्रीममधली तर अनेक मंडळी 10-10 वर्षे एकाच
संस्थेत काम करताना दिसून येत आहेत. स्वताःला सिध्द करायचे दूरच उलट आहे
ते फक्त ढकलत राहवयाचे असेच या मंडळींच्या कामाचे स्वरुप आहे. हे दारिद्र
नारायण वाहिन्यांमध्येही आहे.. तेच होस्ट... तेच गेस्ट...तेच चेहरे... तेच
तेच कॉपीराईटिंग..तोच व्हॉईस यामुळे पाहणाऱ्यांही रटाळपणा जाणवत आहे.
बिझनेस् गणित जुळवताना याकडे कोणाचे लक्ष जात नाही..हे दारिद्र नारायण
खाईत लोटणारे आहे...
- एक वाचक
- एक वाचक