मंदार फणसे यांची अखेर विकेट


मुंबई -  बेरक्याने २७ जानेवारी रोजी दिलेले  वृत्त अखेर खरे ठरले आहे.IBN लोकमतमध्ये  संपादक मंदार फणसे किंवा कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यापैकी एकाची विकेट पडणार असे  वृत्त बेरक्याने दिले होते. अखेर संपादक मंदार फणसे यांची विकेट पडली आहे.
IBN लोकमतचा TRP दिवसेंदिवस घसरत चालला होता. त्याचे खापर संपादक मंदार फणसे यांच्यावर  फोडण्यात आले.प्रशासनाने फणसे याना निष्क्रिय ठरवत  वेबसाईटला बदली करताच फणसे यांनी राजीनामा देणे पसंद केले. दुसरीकडे IBN लोकमतचे संपादकपद रिक्त होताच 'राहा एक पाऊल पुढे'च्या डॉक्टरच्या हालचाली वाढल्या आहेत.
मंदार फणसे यांची विकेट पडणार हे लक्षात आल्यानंतर मंगेश चिवटे यांनी राजीनामा दिला होता. ते गेल्या सात दिवस रजेवर होते, परंतु त्यांना परत घेण्यात आले आहे. तसेच विनोद राऊत यांचा राजीनामा घेण्यात आल्याची चर्चा पसरली आहे,परंतु त्यास दुजोरा मिळाला नाही.