मुंबई - तुळशीदास भोईटे यांनी अवघ्या तीन ते चार महिन्यातच दैनिक
जनशक्तिला जय महाराष्ट्र केला आहे. भोईटे १ मे पासून जय महाराष्ट्र चॅनलला
कार्यकारी संपादक ( आऊटपुट हेड ) म्हणून जॉईन होणार आहेत. "आवारे
पाटलांची विकेट, भोईटे व्हेंटिलेटरवर" हे वृत्त बेरक्याने १ एप्रिल रोजी
प्रसिद्ध केले आहे.
मोजका खप असलेल्या जनशक्तिमध्ये भोईटे फार काळ रमले नाहीत. पुरुषोत्तम आवारे -पाटील यांच्या कामावर मालक कुंदन ढाके समाधानी नव्हते, म्हणून आवारे पाटलांच्या डोक्यावर तुळशीपत्र ठेवण्यात आले होते, पण तेल गेले आणि तूप गेले म्हणण्याची पाळी ढाकेवर आली आहे.
खरं तर तुळशीदास भोईटे यांचा पिंड टीव्ही मीडियाचा.टीव्ही ९, जय महाराष्ट्र, मी मराठी आदी चॅनलमध्ये काम केल्यानंतर मध्यंतरी टीव्ही मीडियात स्पेस नव्हता, म्हणून नाईलाजास्तव भोईटे जनशक्तिसारख्या छोट्या दैनिकात दाखल झाले होते, परंतु तेथेही सीईओबरोबर न जमल्यामुळे त्यांची कोंडी झाली होती, अखेर त्यांनी जनशक्तिला जय महाराष्ट्र करत जय महाराष्ट्र चॅनेल जॉईन करत आहेत. जय महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी बीबीसी मराठी ला गेल्यामुळे ही जागा रिक्त होती. याच जागेवर भोईटे जॉईन होत आहेत.