मुंबई
: पत्रकार हल्लाविरोधी विधेयक आज विधानसभेत विना चर्चेविना मंजूर करण्यात आले. यामध्ये
करण्यात आलेल्या तरतुदीनुसार, हल्लेखोरास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि
५०,००० हजार रुपयांचा दंड अथवा दोन्ही अशा कठोर शिक्षेची तरतूद करण्यात
आलीय.
- विधेयकातील
तरतुदीनुसार, पत्रकारावर कार्य बजावत असताना त्यावर हल्ला केल्यास हल्ला
करणाऱ्यास तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा ५० हजार रुपये दंड अथवा दोन्ही
होऊ शकतं
- पत्रकारांना
कार्य बजावण्यासाठी लागणाऱ्या मालमत्तेचं नुकसान केल्यास त्यांना नुकसान
केलेल्या मालमातेच्या किंमतीच्या दुप्पट रक्कम द्यावी लागेल.
-
दुसऱ्या बाजूला कुठल्याही पत्रकारानं खोटी तक्रार केल्यास आणि हे सिद्ध
झाल्यास त्या पत्रकारालाही तीन वर्षांपर्यंत कारावास आणि ५० हजार
रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही होऊ शकतो.
- पत्रकारावरील हल्ला हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा असेल.
फडणवीस सरकारचे मनःपूर्वक आभार..
पत्रकार संरक्षण कायदा हा कोणत्याही एका संघटनेमुळे किंवा एका व्यक्तीमुळे झालेला नाही. राज्यात १२ पेक्षा जास्त संघटना आहेत... प्रत्येक संघटनेनी ही मागणी उचलून धरली होती... कोणी माझ्यामुळेच हा कायदा पास झाला असे म्हणत असेल तर त्यापेक्षा कोणी मूर्ख नाही... काहींना माझीच .... म्हणण्याची सवय असते...

खरं तर आपण फडणवीस सरकारचे आभार मानायला हवे... पहिला मुख्यमंत्री असा आहे, ज्यांनी हा कायदा पास होण्यासाठी पुढाकार घेतला ... तसेच त्यांनी पत्रकार पुरस्कार स्पर्धा
नियमितपणे घेतल्या, अधिस्वीकृती समिती गठीत केली ..पत्रकाराचे अनेक प्रश्न
तडीस नेले... फडणवीस सरकारचे मनःपूर्वक आभार..