नवी दिल्ली : पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या
प्रत्येकालाच आपल्या भावनांना मुरड घालावी लागते. अनेकवेळा तर पत्रकारांना
बिकट परिस्थितीचा सामना करावा लागलो. छत्तीसगडमध्ये आज अशीच एक घटना समोर
घडली, जिथे पत्रकारांना त्यांच्या भावनांवर किती प्रमाणात नियंत्रण ठेवावं
लागतं, हे दिसून आलं.
छत्तीसगडच्या रायपूरमध्ये आज एका वृत्त वाहिनीच्या महिला अँकरला तिच्या पतीच्याच मृत्यूची बातमी वाचावी लागली. रायपूरहून प्रक्षेपित होणाऱ्या आयबीसी 24 न्यूज चॅनेलची अँकर सुप्रीत कौरला आपल्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी वाचावी लागली.
छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यात आज एक रस्ता अपघात झाला. या घटनेत तीन जणांचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले होते. याची बातमी जेव्हा न्यूज चॅनेलकडे आली, तेव्हा सुप्रीत बातम्या वाचत होती. या घटनेत मृत्यू झालेल्या तीन मृतांमध्ये तिच्या पतीचाही समावेश असल्याची माहिती कुणालाही नव्हती.
पण सुप्रीत बातमी वाचत असतानाच जेव्हा या घटनेचा व्हिडीओ प्रक्षेपित झाला. तेव्हा तिला तिच्या पतीची डस्टर गाडी व्हिडीओत दिसली. यावेळी तिला या घटनेत तिच्या पतीचाही मृत्यू झाला असावा, अशी जाणीव झाली. तिने यानंतर कुटुंबियांना संपर्क साधला, यानंतर तिला मृतांमध्ये तिच्या पतीचाही समावेश असल्याचं समजलं.
यानंतर सुप्रीतला चॅनेल व्यवस्थापनाने तिच्या घरी पाठवलं.