एस.
एम. देशमुख यांच्या पदलोलूपतेबद्दल लिहितांना त्यांच्या चमकोगिरीच्या
सवयीबद्दलही आम्ही लिहिले होते. याच चमकोगिरीचा प्रत्यय एस. एम. देशमुख
यांनी शुक्रवारी पुन्हा दिला. या एस. एम. देशमुख यांनी सोशल मीडियावर एक
पोस्ट टाकत आपण आता सलग तीन दिवस मुंबईतच राहणार असून कायदा मंजूर करून
घेण्यासाठी सर्वांच्या भेटी-गाठी घेणार असल्याचे लिहिले. आता, खुद्द
मुख्यमंत्र्यांनी आपण याच अधिवेशनात कायदा संमत करून घेणार असे अगदी
जाहीरपणे सांगितलेले असल्याने कायदा होणार हे निश्चित मानले जात होते.
तरीही जणू काही हेच सभागृहात ठराव मांडणार आहेत, अशा थाटात चमकोगिरीची संधी
साधली.
.....
ताजा कलम
वरील पत्राशी बेरक्याचा काही एक संबंध नाही...
जर एस. एम. देशमुख यांनी या पत्राला उत्तर दिल्यास ते प्रसिद्ध केले जाईल...
त्यांच्या उत्तराची अपेक्षा ...
- बेरक्या उर्फ नारद
इतकंच
नव्हे तर, शुक्रवारी पत्रकार संरक्षण कायदा दोन्ही सभागृहात संमत
झाल्यानंतर या चमकोगिर महाशयांनी विविध राजकीय पक्षांच्या भेटी-गाठी घेऊन
त्यांना बुके देत आभाराचा कार्यक्रम सुरु केला. लबाडीने “मराठी पत्रकार
परिषदे”च्या विश्वस्तपदावर आणि मग अध्यक्षपदावर स्वत:च स्वत:ची नियुक्ती
करून घेणारे हे दोघेच यात दिवसभर पुढे- पुढे करताना दिसले. अगोदर विरोधी
पक्ष नेत्यांच्या भेटी घेतल्या; मोठी धडपड करूनही सायंकाळपर्यंत
मुख्यमंत्र्यांची काही भेट होत नाही हे पाहून या महाशयांनी मंत्रालयातील
काही पत्रकारांना गळ घालत मुख्यमंत्र्यांना मंत्रालयातील पत्रकार परिषदेत
गाठले. आणि मग त्यांचे राज्यभरातील (?) पत्रकारांच्यावतीने बुके देऊन आभार
मानण्याची आपली हौस भागवून घेतली. पत्रकार परिषदेत आभार मानले म्हणजे तिथे
असणाऱ्या कॅमेऱ्यात आपण टिपले जाऊ आणि चमकू हा हेतू! पण त्यांना तिथे
कुणीही भाव दिला नाही. त्याचठिकाणाहून मग आभार मानतानाचे फोटो धडा-धड सोशल
मीडियावर टाकत यांचा चमकोगिरीचा धंदा सुरु झाला. आभार किती जणांनी मानले तर
हे एस. एम. देशमुख आणि ‘हो’ ला ‘हो’ करणारे त्यांचे पिल्लू किरण नाईक,
बस्स! दोघांनी बुके दिला आणि राज्यभरातील (?) पत्रकारांच्यावतीने मानले
मुख्यमंत्र्यांचे आभार! यांच्याबद्दल उपस्थित करण्यात आलेल्या भानगडींवरील
लक्ष इतरत्र वळवण्यासाठीचा केलेला हा चमकोगिरी खटाटोप नाही का?
आता
मूळ प्रश्न असा आहे, ज्या पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीमुळे हा कायदा
झाला, त्या समितीत पत्रकरांच्या एकूण १६ संघटना आहेत. इतर संघटनेचे मुंबईत
असणारे पत्रकारही कायद्यासाठी सतत कितीतरी पाठपुरावा करीत असत. मग, आता
मुख्यमंत्र्यांचे आभार मानताना या १६ संघटनेतील काही संघटनांच्या तरी
पत्रकारांना सोबत घेऊन एकत्रितपणे आभाराची औपचारिकता पार पडणे योग्य ठरले
असते. पण, यांना चमकोगिरीची इतकी घाई, की उठले आणि पळायला लागले दोघेच फोटो
काढत! कायदा मंजूर व्हावा यासाठी चमकोगिरी न करता प्रयत्न केलेल्या
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतील इतर संघटनांशी केलेला हा कृतघ्नपणा
नाही का? हा चमकोगिरीचा प्रकार नाही का?
श्रेय
लाटण्यासाठी एस. एम. देशमुख यांनी इतकी वर्षे जे केले तेच अजूनही सुरु
आहे. सतत प्रयत्न करणाऱ्या इतर पत्रकारांना बाजूला सारून स्वत:च राजकीय
नेत्यांच्या पुढे- पुढे करीत चमकोगिरीचा केलेला हा प्रकार म्हणजे यांना
‘एस. एम”. नव्हे ‘शेम’ देशमुख म्हणावे असाच आहे.
तूर्त इतकेच...
-एक सच्चा पत्रकार
(प्रत्यक्षात काम करणारा)
.....
ताजा कलम
वरील पत्राशी बेरक्याचा काही एक संबंध नाही...
जर एस. एम. देशमुख यांनी या पत्राला उत्तर दिल्यास ते प्रसिद्ध केले जाईल...
त्यांच्या उत्तराची अपेक्षा ...
- बेरक्या उर्फ नारद