औरंगाबाद
- महाराष्ट्राचा मानबिंदूच्या औरंगाबादच्या मुख्य कार्यालयात तीन वर्षापूर्वी धाकट्या बाबुजीनी
अमुलाग्र बदल करण्यासाठी म्हणून जळगावहून भाऊला आणले. काही दिवसातच धाकटे
बाबुजी राजधानीत गेले आणि इकडे भाऊनी मराठवाडा
आवृत्तीची वाट लावून टाकली. मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यात मानबिंदुचा खप
घसरलाय. संपादकीय विभागात ‘राजकारण’ करण्यातच भाऊची भाऊबंदकी सार्थकी
लागली. चार-दोन चमचे हाताला धरायचे व बाकीच्या लोकांना त्रास द्यायचा ही
भाऊची निती. सोलापूर काय जळगाव काय, सगळीकडे त्यांनी हेच केले.(जळगावात
भाऊची बदली झाल्यावर कर्मचाऱ्यानी पेढे वाटले होते, ही यांची कर्तबगिरी)
फक्त आपले कारनामे मालकाच्या कानावर जाऊ नको म्हणून काळजी घ्यायची. तसे
वाटलेच तर आधीच मालकाचे कान भरून मोकळे. गलेलठ्ठ पगार घेऊन संस्थेच्या
विरोधातच भाऊने कसे काम केले,याची रसभरीत चर्चा सुरु आहे.
मालकाला खपाची चिंता लागलेली असताना भाऊ खप घसरल्याचे खापर इतर विभागाच्या डोक्यावर फोडण्यासाठी तत्पर आहेत. थोरल्या बाबुजीनी आता भाऊला हे विचारले पाहिजे की तीन वर्षे गलेलठ्ठ पगार घेऊन एसी केबिनमध्ये काय दिवे लावले. कॉम्प्युटरवर पत्ताचा गेम खेळण्यापलिकडे दुसरे आणखी काय काय केले. संपादकपदाच्या कारकिर्दीत किती माणसे तयार केली. किती माणसाचे करीअर उध्वस्त केले. कितीजणाचे बळी घेतले. मराठवाड्यात येऊन कोणते नवे प्रयोग केले. संस्थेच्या हिताचे कोणते निर्णय घेतले. संपादक म्हणून मराठवाड्यात नवे किती लेखक तयार केले. किती जणाशी संपर्क ठेवला. किती आमदाराशी त्यांची ओळख आहे. जिल्हा प्रतिनिधींना कोणते नवे विषय दिले. खप वाढावा म्हणून वेगळे लेखन काय केले. संस्थेतल्या उमद्या लोकांना कधी लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले का? असे आणि अनेक प्रश्न आहेत.
बेरक्याला मिळालेल्या माहितीनुसार उलट खप कमी झाला
तरच आपली खुर्ची टिकून राहिल असा कावेबाज विचार करून खप कमी करण्यासाठीचे
उद्योग केले. (कोणते उद्योग केले, तेही बेरक्याजवळ माहिती आहे) संपादकाने
करायची कामे गजाननाच्या हवाली करून मोकळे व्हायचे आणि आपला वेळ ‘राजकारण’
करण्यात घालवायचा हे भाऊचे उद्योग बाबुजी बंद करा, नाही तर संस्थेला
लागलेल्या वाळवीची किड लागल्याशिवाय राहणार नाही. सगळा पंचनामा बाबुजी
रोखठोक करा, मग रिजल्ट बघा. वन टू वन संस्थेतील लोकांशी बोला मग जे समोर
येईल ते ऐकल्यावर तुमचे डोके गरगरल्याशिवाय राहणार नाही. नवी पिढी तुम्हाला
बोलायला उत्सुक आहे. बाबुजी बोलाच एकदा. ! असे संदेश धडकत आहेत. मालकाला खपाची चिंता लागलेली असताना भाऊ खप घसरल्याचे खापर इतर विभागाच्या डोक्यावर फोडण्यासाठी तत्पर आहेत. थोरल्या बाबुजीनी आता भाऊला हे विचारले पाहिजे की तीन वर्षे गलेलठ्ठ पगार घेऊन एसी केबिनमध्ये काय दिवे लावले. कॉम्प्युटरवर पत्ताचा गेम खेळण्यापलिकडे दुसरे आणखी काय काय केले. संपादकपदाच्या कारकिर्दीत किती माणसे तयार केली. किती माणसाचे करीअर उध्वस्त केले. कितीजणाचे बळी घेतले. मराठवाड्यात येऊन कोणते नवे प्रयोग केले. संस्थेच्या हिताचे कोणते निर्णय घेतले. संपादक म्हणून मराठवाड्यात नवे किती लेखक तयार केले. किती जणाशी संपर्क ठेवला. किती आमदाराशी त्यांची ओळख आहे. जिल्हा प्रतिनिधींना कोणते नवे विषय दिले. खप वाढावा म्हणून वेगळे लेखन काय केले. संस्थेतल्या उमद्या लोकांना कधी लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिले का? असे आणि अनेक प्रश्न आहेत.