लातूर
एकमतमध्ये मंगेश डोंग्रजकर नावाचे पत्रकारितेतील हुशार संपादक आल्यापासून
एकमतमध्ये काय काय घडत आहे. हे जणू आपणास माहितच नाही. तरी थोडीसी माहिती
देतोच....कर्मचाऱ्यांचा पगार कधीच वेळेवर होत नाही. बोनस नावाचा प्रकार
गेल्या अनेक वर्षांपासून दिला जात नाही. गेल्या दिवाळीला काहीजणांना तोंडे
पाहून बोनस दिला.
एवढेच नाही तर आणखी एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार म्हणजे १ जानेवारी ते ४ मे २०१७ म्हणजे तब्बल चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगारी दिल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे हाल झाले. जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीच्या काळात सगळयांच्या सुटया रद्द केल्या. देशमुखांचे दैनिक म्हणून जाहीर कोणी बोलण्यास धजत नव्हते. पण कर्मचारी संपादकांकडे ओरड करू लागल्याने मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना थोडीबहूत उचल देणे सुरु केले.
आता तर व्यवस्थापनाने वेगळेच धोरण राबविणे सुरु केले आहे.कर्मचाऱ्यांना पगार वाढीचे गाजर दाखवून, दबाव टाकून ३१ डिसेंबर २०१६ ची मागील तारीख टाकून राजीनामे घेतले जात आहेत. त्यांना सीटीसी अर्थात करार पद्धतीवर नव्याने नियुक्त्या करीत आहेत. काहीजण वैतागून नोकरी सोडून गेले आहेत.
दैनिक एकमतचे सर्क्युलेशन कमी झाल्याने लातूर आवृत्ती ब दर्जावरून क दर्जावर आली आहे. मंगेशराव आल्यापासून काहीतरी मंगल घडेल असे सर्वांनाच वाटले होते मात्र सगळे अमंगल घडत आहे.

--- एक कर्मचारी