औरंगाबाद - महाराष्ट्राचा मानबिंदूच्या दिनांक ६ मे च्या अंकातील पान
क्रमांक १२ वरील पाहिजेतच्या जाहिरातीने मराठवाड्यातील कर्मचाऱ्यात मोठी
खळबळ माजवून दिली आहे. बातम्यातून वाचकांमध्ये खळबळ उडवून देण्याऐवजी
कर्मचाऱ्यामध्येच अस्वस्थता निर्माण करण्याच्या या जाहिरातीचे अनेक अर्थ
काढले जात आहेत. ही जाहिरात कशासाठी आणि कोणाला टार्गेट करून काढली आहे,
याची चर्चा आहे.
जिल्हा प्रतिनिधी, उपसंपादक व वार्तासंकलक पाहिजेत, अशी जाहिरात असली तरी किती पदे याचा उल्लेख न करता मराठवाडा आवृत्तीसाठी असे म्हटले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सगळ्याच सेंटरवर बदल होणार, हे निश्चित. मराठवाड्यात सगळ्याच सेंटरवर मानबिंदूची झपाट्याने होत असलेली पिछेहाट आणि त्या पार्श्वभूमीवर आलेली जाहिरात संपादकीय विभागातील सर्वांनाच अस्वस्थ करणारी आहे. कोणी याला भाऊंची ‘गेम’ म्हणत आहे तर कोणी याला जूनमध्ये पगारवाढ मागू नये म्हणून शेटजीनी दिलेले इंजेक्शन म्हणू लागले आहे.
दुसरीकडे ३५ वर्षाच्या प्रदीर्घ वाटचालीत मानबिंदूला स्वत:च्या कर्मचाऱ्यामधून जिल्हा प्रतिनिधी तयार करता येऊ नयेत, याची खंत अनेकांना वाटत आहे. काम करणाऱ्याच्या पायात पाय घालून त्याला काम करू द्यायचे नाही आणि गटबाजी करून संस्थेचेच नुकसान करण्याची स्टॅटीजी वरीष्ठांची असल्याने मानबिंदुची घसरण होत आहे. वरीष्ठ पातळीवरील मंडळीच संस्थेची वाट लावण्याचे काम जाणूनबुजून केले जात आहे. चाणाक्ष शेटजींच्या लक्षात ही गोष्ट कशी काय येत नाही, याचेच आश्चर्य आहे. सकाळपासून बेरक्याला अनेकांनी जाहिरातीची नाराजी कळवली असून काहीजण ‘रामराम’ ठोकण्याच्या तयारीला लागले आहेत. आधीच भाऊच्या कार्यपध्दतीला कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांना भाऊच्या हातून गेम होण्यापूर्वीच आपला रस्ता शोधण्याचा पर्याय चांगला वाटू लागला आहे. तर काहीजणांनी बाबुजींना भेटून संपादकीय विभागात सुरू असलेल्या गेम शोची माहिती त्यांच्या कानावर घालून मग ‘रामराम’ ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे मुख्य कार्यालयातही फेरबदल होणार असल्याची माहिती बेरक्याला मिळाली आहे. विदर्भातून मोठ्या प्रमाणात लोक औरंगाबादला टाकले जाणार असून गणपती बप्पासह अनेकांना विदर्भाचा रस्ता दाखविण्यात येणार आहे. एकूण काय तर चांगला सेनापती देण्याच्या ऐवजी आता सेनापती संस्थाद्रोही आणि शेटजीची सैनिक बदलण्याची घाई, यामुळे मानबिंदूच्या हाती निराशाच येणार आहे.