मुंबई - जय महाराष्ट्राची अवस्थाही महाराष्ट्र १ सारखी झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्याचा पगार अद्याप झाला नाही. एकीकडे
कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यांपासून पगार वाढीचं गाजर दाखवण्यात येत आहे
तर दुसरीकडे एप्रिल आणि मे महिन्याच्या पगारासाठी तारीख पे तारीख सुरु
आहे. सीईओ
राजेश क्षीरसागर यांनी आणखी 4 आठवडे पगार होणार नाही असे स्पष्ट केले
आहे. एप्रिलच्या पगारासाठी १५ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मात्र १५
जुलैलाही पगार होईल याची खात्रीमॅनजेमेंटने दिली नाही. त्यातल्या त्यात
सगळ्यात लो Pay scale मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.
त्यामुळे पगार न मिळाल्यानं कर्मचारी अस्वस्थ झालेत.
हास्यास्पद म्हणजे एकीकडे 'लक्षवेधी'मध्ये जय महाराष्ट्रने 7 वा वेतन आयोगानुसार वेतनवाढीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा देणे योग्य आहे का? याबाबत चर्चा घडवून आणली. पण इथे जय महाराष्ट्र मध्ये कर्मचाऱ्याचं दुखणं सांगणार कोणाला? आपलेच दात आपलेच ओठ...