महाराष्ट्र १ चे आजी - माजी कर्मचारी पगारासाठी कोर्टात जाण्याच्या तयारीत
आहेत. महाराष्ट्र १ मध्ये तीन महिन्यांपासून पगार नाही. त्यामुळे अनेकांनी
चॅनलला सोडचिठ्ठी दिली आहे. जे सोडून गेले त्यांना नियमाने ४५ दिवसानंतर
राहिलेला पूर्ण पगार देणे बंधनकारक आहे. असे असताना माजी कर्मचाऱ्यांचा
पगार कंपनीने रोखला आहे. काहींनी कंपनीला लिगल नोटीस पाठवल्याचे कळतेय.
त्यामुळे कंपनीतील आजी कर्मचारी देखील कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत.
दुसरीकडे कंपनीने भरमसाठ फी उकळून नवख्या उमेदवारांना टिव्ही शिकवण्याचे
काम सुरु केले आहे. ट्रेनिंगनंतर चॅनलमध्ये काम करण्याची संधी देवू अशा
घोषणांना भुलून अनेक हौशे मुले - मुली फी भरायला तयार आहेत. यातून चॅनेल
आर्थिक आधार शोधतोयमात्र त्यातून अनेकांची फसगत होत आहे.