औरंगाबाद - बेरक्याची बातमी तंतोतंत खरी ठरली आहे.औरंगाबाद गावकरीमध्ये फूट पडली असून अंबादास मानकापे - पाटील यांनी स्वतःच्या मालकीचा आदर्श गावकरी बुधवारपासून सुरू केला आहे.आता मूळ गावकरी सुरू करण्यासाठी डॉ.अनिल फळे आणि त्यांची टीम कामाला लागली आहे.
नाशिकच्या वंदन पोतनिस यांच्या मालकीचे गावकरी वृत्तपत्र आहे.गावकरीची औरंगाबाद आवृृत्ती दहा वर्षानंतर बंद पडली होती मात्र अंबादास मानकापे या सहकार क्षेत्रातील दिग्गज उद्योगपतीने गावकरी भागिदारीत सुरू केला होता.डॉ.अनिल फळे यांनी मध्यस्थी करून गावकरीला भरारी निर्माण करून दिली होती.टायटल पोतनिसाचे आणि पैसा मानकापे यांचा.मात्र वर्षभरात चार कोटी घालूनही त्यात मालकी हक्क नसल्यामुळे मानकापे यांनी भागिदारी तोडून स्वतःच्या मालकीचा आदर्श गावकरी हा नवा पेपर सुरू केला आहे.आदर्श बिल्डींगमध्येच संपादकीय विभाग असून प्रिंटींग सांजवार्ता या सांज दैनिकातून केली जात आहे.कार्यकारी संपादक म्हणून अभय निकाळजे काम पहात असून,टीममध्ये फाटाफूट झाली आहे.
दुसरीकडे मानकापे यांनी भागिदारी तोडल्यानंतर पोतनिसांनी मूळ गावकरी सुरू करण्याची जबाबदारी पुन्हा डॉ.अनिल फळे यांच्यावर सोपवली आहे.डॉ.अनिल फळे,दिनेश हारे,आप्पासाहेब गोरे या जुन्या टीमने खोकडपुर्यातील जागेत पुन्हा गावकरीचे बस्तान बसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.नवा फायन्सर शोधण्यात येत आहे.गावकरी सुरू झाल्यास गावकरी विरूध्द आदर्श गावकरी यांच्यात सामना सुरू होणार आहे.