प्रशांत माफ कर आम्हाला !!
अमरावतीच्या प्रशांत कांबळेवर पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. एक संघर्ष करणारा पत्रकार पोलीसांना गुन्हेगार वाटला. व्यवस्थेविरूध्द आवाज उठवणारा प्रत्येक आवाज असाच दाबून टाकण्याची पध्दत प्रशासनात आली आहे. पोलीसांना मारहाण अथवा वाद झाल्यास त्याला माध्यमातून जोरदार प्रसिध्दी मिळते पण पोलीसांनी नाहक कोणास मारले तर लोक त्यावर नाना त-हेच्या शंका घेऊ लागतात. एका पत्रकाराने खुनाच्या गुन्ह्याला वाचा फोडण्यासाठी केलेला प्रयत्न हा गुन्हा कसा काय ठरू शकतो?
अमरावतीच्या प्रशांत कांबळेवर पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. एक संघर्ष करणारा पत्रकार पोलीसांना गुन्हेगार वाटला. व्यवस्थेविरूध्द आवाज उठवणारा प्रत्येक आवाज असाच दाबून टाकण्याची पध्दत प्रशासनात आली आहे. पोलीसांना मारहाण अथवा वाद झाल्यास त्याला माध्यमातून जोरदार प्रसिध्दी मिळते पण पोलीसांनी नाहक कोणास मारले तर लोक त्यावर नाना त-हेच्या शंका घेऊ लागतात. एका पत्रकाराने खुनाच्या गुन्ह्याला वाचा फोडण्यासाठी केलेला प्रयत्न हा गुन्हा कसा काय ठरू शकतो?
प्रशांतवर गुन्हा दाखलल
झाल्यानंतर दोन तिन पत्रकार संघटना व हल्ला विरोधी समिती यात सहभाग घेईल
असे वाटले होते. मात्र फारसं कोणी पुढे आले नाही. शेवटी प्रशांतच्या
जवळच्या अथवा ओळखणा-या पत्रकारांना यात सहभागी व्हावं लागलं. त्यामुळे विषय
जामिन मिळण्यापर्यंत तरी आला. आमचे मित्र अनिरूध्द जोशी यांनी व्हाटसअप वर
सेव्ह प्रशांत असा डीपी ठेवत एक सद्भावना दाखवली त्यावरूनच हा विषय लिहावा
वाटला. त्या सोबत एक पुरस्कारपप्राप्त पत्रकार गुन्हेगार कसा ठरतो हा
प्रश्न देखील मनात सतत येत होताच.
या दुर्लक्षाला
जातीय किनार असल्याची चर्चा देखील समाज माध्यमातून झाली. पत्रकार संघटनांवर
दोन वेगवेगळ्या जातींचे वर्चस्व आहे. आणि त्यामुळेच प्रशांतला न्याय
देण्यासाठी संघटना पुढे आल्या नाहीत हे देखील आरोप झाले.त्यात तथ्य किती
माहित नाही पण दुर्लक्ष झाले हे खरे आहे. मागच्या कांही दिवसात प्रशांतला
सोडविण्यासाठी सर्वंकश प्रयत्न झाले नाहीत.हे वास्तव आहे. या विषयात खरच
जातीय कारण असेल तर ते तपासले पाहिजे आणि दूर केले पाहिजे.
पत्रकार
सतत पोलीस आणि प्रशासनाच्या बॅडबुक मध्येच असतो. कोणाला सन्मान मिळत असेल
तर तो देखील तोंड देखला असतो हे लक्षात घेतले पाहिजे. तशी कांही उदाहरणे
देखील आहेत. अनिरूध्द जोशी एकमतचे वरिष्ठ वृत्तसंपादक एकदा शेअर रिक्षाने
सिडको चौकातून कार्यालयाकडे येत होते. एका साध्या गणवेशातील पोलीसाने ती
रिक्षा अडवली. तो पोलीस दमदाटीची भाषा करत होता. म्हणून जोशीनी फक्त
ओळखपत्र मागितले. ओळखपत्र मागितल्यामुळे पोलीस महोदयांना राग आला. आणि
त्यांनी जोशीची रवानगी थेट पोलीसठाण्यात केली. ही करताना वायरलेस वर एक
जबरदस्त गोंधल माजविणारा व्यक्ती पकडल्याची वर्दी देखील देऊन टाकली. फक्त
ओऴखपत्र मागणे हा शांततेचा भंग होता. शेवटी अनेकांना हस्तक्षेप करत
सोडण्यासठी प्रयत्न करावे लागले. प्रतिबंधात्मक नोटीस देऊन सोडले.
असाच
प्रकार उस्मानाबादेत घडला. दीपाली घाडगे या महिला पोलीस अधिका-याने सुनिल
ढेपे या पत्रकाराचा सरकारी गेमच केला.पंकज देशमुख, राजतिलक रोशन या अधिकाऱ्याच्या मदतीने ढेपे यांना खोट्या गुन्ह्यात गोवले. त्यांची अनेक दिवस तुरूंगात गेली.
यावेळी देखील पत्रकार संघटनातील स्थानिक वाद एकी दाखवू शकले नाहीत. या आधी
निवडणुकीच्या काळात एका वृत्तवाहिणीचा कार्यकृम परवानगी शिवाय घेतल्याची
बतावणी करत याच पोलीस अधिका-यांनी त्या वृत्तवाहिण्याच्या वरिष्ठ
पत्रकारावर गुन्हा दाखल केला होता. त्याच बाईंनी औरंगाबादच्या पत्रकारांना
देखील धमकी दिली आहे. हे सगळं घडत आहे. आणि आपण एकमेकाच्या कागाळ्या
करण्यात मग्न आहोत का हे तपासले पाहिजे
मी मुद्दाम
तीव उदाहरणे दिलीत तीव वेगवेगळ्या जातीची आहेत पण भोगलं मात्र सारखच आहे.
ते त्या जातीचे म्हणून नाही तर ते पत्रकार होते म्हणून सहन करावे लागले. मी
पुण्यनगरीत असताना केज तालुक्यातील युसुफ वडगाल मध्ये शाळेतील भ्रष्टाचार
बाहेर काढणा-या दलीत पत्रकारावर खंडणीचा गुन्हा दाखल केला जात होता.त्याच
वेळी मी संपादक म्हणून भुमिक गेत माझ्या पत्रकारावर गुन्हा दाखल होऊ दिला
नव्हता. पाटोद्यातील अमिरशेख सोबत असाच प्रकार घडला त्यावेळी संपादक म्हणून
त्याच्या मागे उभा राहिलो. रेणापूर तालुक्यातीलदर्जी बोरगावच्या नामदेव
शिंदे सोबत असच कांहीस घडलं होतं. तेव्हा प्रत्येक वेळी पत्रकार ही एकच जात
समोर दिसली.
पत्रकाराची जात फक्त पत्रकार असते.
वेगवेगळ्या प्रसंगात तो वेगवेगळ्या बातम्या करत असतो आणि त्या बातम्यामुळे
ज्याचे नुकसान अथवा फायदा होतो तो त्या पत्रकाराची जात काढून जगासमोर आणत
जातो आणि पत्रकाराचे करीयर या जातीय लढाईत अडकून जाते. प्रशांतच्या बाबतीत
असेच तर झाले नाही ना याचा विचार करावा लागेल. प्रशांत कांबळे म्हणून
कुलकर्णी जोशी पाटील देशमुख त्याच्या मदतीला आले नसतील तर ते खुपच गंभीर
आहे. एक कुलकर्णी म्हणून प्रशांत तुझी माफी मागतो. मी कारण माझं आडनाव
कुलकर्णी आहे पण मी एक पत्रकार आहे. प्रशांत पत्रकार आणि सुशील पत्रकार अशी
आपली ओळख आहे. माझ्या बांधवापैकी कोणावर खरच अन्याय होणार असेल तर समोर
यायलाच हवं.
प्रशांत आम्ही तुझ्यासोबत आहोत. प्रशांतला या गोवलेल्या गुन्ह्यामधून बाहेर काढायला आपण सगळ्यांनीच पुढाकार घ्यायला हवा.
- सुशील कुलकर्णी
संपादक, दैनिक एकमत
औरंगाबाद