तीन
महिन्यापूर्वी वागळे यांनी टीव्ही ९ जॉईन केले होते. त्यांना सल्लागार
संपादक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. रात्री ९ वाजता त्यांचा सडेतोड हा
डिबेट शो चालत असे. शेतकरी संपात त्यांनी पुलतांबा गावात जाऊन ग्राउंड
रिपोर्ट केला होता,त्यामुळे चॅनलचा टीआरपी वाढला होता. चॅनेल तिसऱ्या
क्रमांकावर आले होते..
परंतु वागळे यांचा डिबेट शो आजपासून बंद
करण्याचा निर्णय टीव्ही ९ ने घेतला आहे. टीव्ही ९ वर राजकीय दबाव होता
म्हणूनच डिबेट शो बंद केल्याचे सांगितले जात आहे.वागळे यांचा डिबेट शो पाहणारे अनेक चाहते आहेत . हा शो बंद झाल्याने टीव्ही ९ चा टीआरपी घसरणार, अशी चिन्हे आहेत
आजपासून माझा 'सडेतोड' हा कार्यक्रम TV9 वर होणार नाही. चॅनेलने तडकाफडकी तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे !
- निखिल वागळे.
निखिल वागळे यांची विकेट का पडली ?
टीव्ही
९ मराठीवर रात्री ९ वाजता निखिल वागळे यांचा सडेतोड हा डिबेट शो सुरु
होता, तो आज चॅनलने अचानक बंद करून निखिल वागळे यांना नारळ दिला, वागळे
पाठोपाठ इनपुट हेड अभिजित कांबळे यांनीही राजीनामा दिला आहे...
नेमकं काय घडले ?
काल दि, १९ जुलै रोजी सडेतोड मध्ये