औरंगाबाद
- लोकमतच्या कर्मचाऱ्यांना यंदा वेतनवाढ मिळणार नाही, असे लोकमतचे मालक
आणि मुख्य संपादक राजेंद्रबाबू दर्डा यांनी गुरुवारी जाहीर केले.पुढच्या
वर्षी वेतनवाढ मिळेल पण कामाचा दर्जा आणि गुणवत्ता पाहूनच दिला जाईल असेही
त्यांनी स्पष्ट केले. लोकमतने मजिठिया वेतन आयोगाला मूठमाती देत वेरिएबल पे लागू केला आहे, त्यामुळे लोकमतचे कर्मचारी अस्वस्थ झाले आहेत.
वेरिएबल पे नेमका काय आहे हे सांगण्यासाठी मुंबईहून दोघेजण आले होते. तसेच करण दर्डा, कापोर्रेट जनरल मॅनेजर राजीव अग्रवाल, जनरल युनिट मॅनेजर संदीप बिष्णोई, एच. आर. व्हाईस प्रेसिडेंट बालाजी मुळे आदी उपस्थित होते. राजीव अग्रवाल आणि संदीप बिष्णोई यांच्या सुपीक डोक्यातूनच वेरिएबल पे ची संकल्पना पुढे आल्याची चर्चा सुरु आहे...