मुख्यमंत्र्यांनी दिले स्वतंत्र चौकशीचे आदेश,
10 आमदारांनी केली लक्षवेधी दाखल, पत्रकारांचा लढा निर्णायक वळणावर.....
पत्रकार
प्रशांत कांबळे ,अभिजित तिवारी व बुलढाणा येथील प्रताप कौसे यांना खोट्या
गुन्ह्याखाली अडकवून, त्यांची पत्रकारिता संपवण्याचा प्रयन्त अमरावती
बुलढाणा पोलिसांनी केला होता. मात्र प्रशांतवरील अन्यायाच्या विरोधात
राज्यभरातील सर्व पत्रकार एकत्र आले आणि जोरदार लढा उभारला गेला. राज्यात
ठीक ठिकाणी पत्रकार बांधवांनी निवेदनं दिली, आंदोलन केली.सर्वच पत्रकारांनी
जमेल त्या पध्दतीनं या लढ्याला साथ दिली आणि हळूहळू या लढ्याला एक व्यापक
स्वरूप आलं.
*अर्थमंत्री
सुधीरभाऊ मुनगंटीवार , समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले* यांनी स्वतः लक्ष
घालून प्रशांतला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अनेक संवेदनशील
लोकप्रतिनिधींनी प्रशांतची बाजू घेतली आणि विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित
करण्याचं आश्वासन दिलं, *आज प्रशांतसंदर्भात तब्बल 10 पेक्षा जास्त
आमदारांनी लक्षवेधी दाखल केली आहे.* दुसऱ्या बाजूने कायदेशीर लढाईसुद्धा
सुरु झाली आहे.
आंदोलनाच्या
दुसऱ्या टप्प्यात आम्ही सर्व पत्रकार बांधव पुन्हा एकत्र जमलो आणि
विधिमंडळाकडे मोर्चा वळवला. *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* यांची त्यांच्या
कार्यालयात भेट घेतली,त्यांना निवेदन दिलं, *या प्रकरणी स्वतंत्र पोलीस
चौकशीचे आदेश देत, प्रशांतला न्याय मिळवून देईल असं आश्वासन
मुख्यमंत्र्यांनी दिल.* त्यानंतर *गृहराज्यमंत्री रणजित पाटील* यांची भेट
घेतली, या प्रकरणी दोषी आढळून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर सरकार कडक कारवाई
करेल असं आश्वासन गृहराज्यमंत्र्यांनी उपस्थित पत्रकारांना दिलं.
*विधानपरिषदेचे
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे* यांची भेट घेतली, लक्षवेधीद्वारे प्रशांतचा
मुद्दा सभागृहात उपस्थित करणार असल्याचं त्यांनी सांगितल आणि त्याची
प्रक्रियासुद्धा तात्काळ पूर्ण केली. *यावेळी पत्रकार विलास आठवले, यदु
जोशी, दिलीप सपाटे, धर्मेंद्र झोरे, विवेक भावसार, रणधीर कांबळे, मनोज
भोयर, विनोद राऊत, गोविंद तुपे, भारत भिसे, ,राजू सोनवणे, एहसान अब्बास,
सुशांत सावंत, चौधरी, राहुल पहुरकर* यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.
दुसरीकडे
*शेकापचे नेते भाई जगताप, आमदार रवी राणा, बच्चू कडू, यशोमती ठाकूर, सुनील
देशमुख, प्रकाश गजभिये* यांच्यासह तब्बल दहा आमदारांनी या प्रकरणी
लक्षवेधी दाखल केली आहे. पुढच्या आठवड्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात
प्रशांतचा मुद्दा समोर येईल. या प्रकरणात *यदु जोशी, विनोद राउत, ऍड.विवेक
ठाकरे, राहुल पहुरकर* या चार पत्रकारांची चौकशी समिती लवकरच आपला अहवाल
सादर करणार आहे. राज्यातील सर्व पत्रकारांच्या एकजुटीतून सुरु झालेला हा
लढा अजूनही पूर्णत्वास आलेला नाही, मात्र तो निर्णायक टप्यात आलाय. यापुढे
पोलीस कुणाचाही प्रशांत कांबळे, अभिजित तिवारी प्रताप कौसे करणार नाही
तोपर्यंत हा लढा असाच सुरु राहणार आहे.
*राज्यातील पत्रकार संघटीत होवून हा लढा लढत आहेत त्यामुळे नक्कीच आपल्या सर्वाना यश मिळेल.*