उघडा डोळे , बघा नीट !

मुलींची 'तस्करी' लातूरची 'मस्करी'  लातूरच्या बदनामीला जबाबदार कोण?

आज लातूरच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. शैक्षणिक पंढरी असलेल्या लातूरला काळिमा फासण्याचा पद्धतशीर प्रयत्न करणाऱ्या मंडळींना थोडीशीही लाज वाटली नाही, बिनधोकपणे मिसिंग केसेसला तस्करी नाव देऊन स्वतःची लाल करून घेणाऱ्या एकालाही बातमीची सत्यता तपासावी वाटू नये हे लातूरचे दुर्दैव आहे. घटना घडते काय?आम्ही सुतावरून स्वर्ग गाठतो काय?पाठीमागे काय होत आहे यामुळे कोणाची बदनामी होईल याची कसलीही तमा न बाळगता लातूरची बदनामी करण्याचा अधिकार कोणी दिला?आज शांत असलेल्या लातूरला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून महाराष्ट्रभर 300 मुलींची तस्करी झालीय असा आरोप करताना डोळे उघडे का राहिले नाहीत,की उगाच पुढे पळायच्या नादात ढुंगणाचे सुटून रस्त्यावर पडलेलेही त्यांना दिसले नाही,काय म्हणावे अशाा बदनामी करणाऱ्या महाभागांना हा प्रश्न सतत मनामध्ये येत आहे.सत्य ऐकल्यानंतर रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही,शांत लातूरला अशांत करण्याचा ठेका उचललेल्या या सगळ्यांवर लातूरकरांनी केसेस दाखल केल्या पाहिजेत.

      ३०० हा जादुई आकडा शोधून ढोलकी वाजवणाऱ्या या ढोलकी पटूने थोडा तरी लातूरचा विचार करायला हवा होता.उचलली जीभ आणि लावली टाळाला जे म्हणतात ते अगदी खरे आहे.खोटे पचवून वरून करपलेली ढेकर देणाऱ्या अजीर्ण पोटयाला लातूरकरांची बदनामी करताना हगवण का लागली नाही असे वाटू लागले आहे.
घटना घडली अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लग्न लावून दिल्याची,त्यामध्ये पोलिसांनी 10 लोकांना अटक केले,यातली सूत्रधार जी पूर्वाश्रमीची काँग्रेसची आणि आता भाजपची असलेल्या पूनम शहाणेसह 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले,ही महिला वधुवर सूचक मंडळ चालवते.तिने केलेल्या चुकीला तर माफी नाहीच पण काही जणांची ही बातमी मिसिंग झाली आणि त्यांनी,डोळे उघडे न ठेवता पोलिसांना आपल्याकडे किती मिसिंग आहेत हे आकडा विचारला,कुठल्यातरी अर्धवटरावानी 300 चा आकडा मिसिंगचा सांगितला,याने चक्क मिसिंगला तस्करीचे रूप देऊन मागच्या घटनेशी अर्थ लावून सगळीकडे गाजावाजा केला आणि 300 महिलांची तस्करी सांगून टाकली. पोलीस सांगतात हे मिसिंग आहे,तेही 300 नसून 180 महिला मिसिंग आहेत.त्यातील 154 महिला सापडल्या असून 26 महिला मिसिंग आहेत.तस्करी किंवा गायब हे शब्द ऐकूण लातूरकरांची झोप उडाली आहे,पोलीस हैराण झाले आहेत,विधानसभेत रणकंदन माजले आहे,आमदार अमित देशमुख आणि पालकमंत्री संभाजी पाटील यांच्यात श्रेयवादाची चढाओढ लागली आहे, किमान जिल्ह्याची इतकी बदनामी होताना पोलिसांचा विचार घेण्याचे सौजन्य कुणालाच वाटू नये याचेच नवल वाटत आहे.
हा जिल्हा शांत आहे,शैक्षणिक परंपरा आहे,बाहेरून मुली येथे शिकायला येतात,अनेक पालक चिंतीत होणार याची थोडीही चिंता असू नये,याचीच कमाल वाटत आहे.बिनधास्तपणे 300 मुली गायब सांगताना तुमची जीभ का झडली नाही,जर या शहरात इतक्या मुली गायब झाल्या असत्या तर किती गजहब माजला असता पण ही लातूरची बदनामी होताना आम्ही मात्र निमूटपणे पाहत बसलो आहोत,अनेक गोष्टीची चर्चा करून सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या महावीरांनी लातूरची खोटी बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत,आणि पोलिसांनी कसलीही तमा ना बाळगता लातूरची बदनामी थांबवली पाहिजे,आज जिल्हाभर लोक भयभीत आहेत मुली घरातून बाहेर पडावे की नाही या दहशतीखाली आहेत,अश्यावेळी महाराष्ट्रभर होणारी बदनामी थांबायला हवी,या शहरात मुली देणारे विचार करतील,येणाऱ्या मुलीही विचार करतील,या सगळ्यांना दिलासा मिळायला हवा,खोट्या प्रतिष्टेसाठी,प्रसिद्धीसाठी,अथवा बातम्यांच्या वॉरमध्ये लातूरला वेठीस धरू नका आणि बदनामी थांबवा...
- संजय जेवरीकर, ज्येष्ठ पत्रकार 
 .....
 पाहा व्हिडीओ