मुंबई - शेमचा खास चमचा म्हणून ओळखला जाणारा किरण्या एकेकाळी परळच्या दारूच्या अड्डयावर दारूड्यांना दारू देण्याचे काम करीत होता.त्याच्या अड्डयावर काही पत्रकार जात होते,त्यातून त्याची आणि काही पत्रकारांशी ओळख झाली.
एका पत्रकाराच्या ओळखीमुळे त्याला इंडियन एक्स्प्रेस मध्ये प्यूनची नोकरी मिळाली.रात्री पेपरचे गठ्ठे बांधण्याचे काम त्याला मिळाले.तो प्यून असताना दत्ता सामंत यांच्या कामगार युनियनने इंडियन एक्स्प्रेसमध्ये संप पुकारला होता.त्यावेळी संपाची कोंडी फोडण्यासाठी मालकाने किरण्याचा वापर केला.संपाची कोंडी फोडण्यात किरण्या यशस्वी झाला आणि मालकाने त्याना बक्षिस म्हणून वसुली क्लर्क म्हणूून प्रमोशन दिले.
जाहिरात बिलाची वसुली करण्यासाठी तो मंत्रालयात जावू लागला.मंत्रालयात तो पत्रकार म्हणून सांगू लागला.तो वसुली क्लर्क असताना पत्रकार म्हणून सांगत असल्याचे संपादक अरूण टिकेकर यांना कळताच त्यांनी इंडियन एक्स्प्रेसमधून किरण्याला हाकलून लावले.
त्यानंतर त्याने इचलकरंजीहून प्रसिध्द होणार्या एका स्थानिक दैनिकाचे मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्ड आणले.वास्तविक इचलकरंजीच्या त्या पेपरचे चार अंकही मुंबईत येत नाहीत.त्याचे शिक्षण बारावी पण नाही.त्याला चार ओळीची बातमीही लिहिता येत नाही,दुसर्याच्या बातम्या कॉपी पेस्ट करून तो पत्रकारिता करतो.कार्डचा उपयोग मंत्रालयात दलाली करण्यासाठी तो करीत आहे.
शेम अलिबागमध्ये असताना त्याची आणि किरण्याची ओळख झाली,शेमचा मालकाची मंत्रालयातील कामे करण्यासाठी दलाल हवाच होता.त्याने किरण्याला हाताशी धरले.मग काय किरण्या शेमचा खास चमच्या बनला.शेमची सगळी कामे करू लागल्याने त्यास बक्षिस म्हणून अधिस्वीकृती मिळवून दिली.बारावी शिक्षण नसताना त्यास अधिस्वीकृती कशी काय मिळाली,हा संशोधनाचा विषय आहे.शेमने त्याला परिषदेचा अध्यक्षही करून टाकले होते.वास्तविक किरण्याचे अडनाव वेगळे आहे.त्याचा एक भाऊ परळचा गुंड होेता,म्हणून त्याने चक्क अडनावच बदलले आणि लोकांची दिशाभूल करून,वावरू लागला आहे.त्याने परळमधील एकाचे घर हडप केल्याचीही चर्चा आहे.
दारूच्या अड्डयावर काम करणारा किरण्या शेमचा खास चमचा आणि मंत्रालयातील दलाल म्हणून सध्या कुप्रसिध्द आहे.त्याच्या बाकी भानगडी लवकरच ....