मुंबई
- बेरक्याचे भाकीत पुन्हा एकदा खरे ठरले आहे. टीव्ही ९ ( मराठी) चे संपादक
निलेश खरे यांनी अखेर आज राजीनामा दिला आहे. ते लवकरच साममध्ये संपादक
म्हणून जॉईन होतील...
दुसरीकडे टीव्ही ९ मध्ये 'देशमुखगिरी' वाढली आहे. यांच्यापेक्षा वयाने सिनियर असलेल्या रिपोर्टरला अपमानजनक शब्दाचा वापर करणे, अधिकार नसताना "घरी बस, अशी धमकी देणं या सगळ्या गोष्टीं वाढल्या आहेत, त्यामुळे आता अभिषेक शर्मा कधी येतात आणि ही देशमुखी वतनदारी कधी बंद करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
साम पुन्हा स्वतंत्र
साम चॅनल विकण्यात आले, अशी अफवा मागे पसरली होती. मात्र ते विकण्यात आले नव्हते. ( म्हणून बेरक्याने न्यूज दिली नव्हती ) एका कंपनीला काही हक्क देण्यात आले होते, पण ते हक्क काढून घेण्यात आले आहेत. या कंपनीबरोबर असलेला करार रद्द करण्यात आला आहे. सामचे सर्व हक्क सकाळ मीडियाकडेच आहेत.चॅनल चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी निलेश खरे यांच्या सह काही जण जॉईन होत आहेत.