बेरक्या नेमका आहे तरी कोण ?

बेरक्या ब्लॉग  म्हणजे मराठी  मीडियातील बित्तंबातमी देणारे न्यूज पोर्टल... मराठी मीडियात जे घडते, जे  घडणार आहे किंवा नवीन काय येत आहे? कोण कोठे जॉईन झाला किंवा  जॉईन  होणार ? कोण राजीनामा दिला ? याची माहिती देणारे पोर्टल.बेरक्याची बातमी १०० टक्के खरी असते, हे आम्ही नव्हे आमचे वाचक म्हणतात. आम्ही दिलेले सर्व अंदाज अचूक ठरले आहेत. म्हणून बेरक्याला मराठी मीडियाचे पीटीआय, गॅझेट म्हणून संबोधले जाते. आम्ही हा ब्लॉग सुरु केला नसता तर मीडियातील घडामोडी कळल्या असत्या का ?
बेरक्याला कोणी मित्र नाही किंवा कोणी शत्रू नाही... सात वर्ष झाले बेरक्या अखंडीत चालू आहे. बेरक्याला वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा तिटकारा आहे. जे मुखवटे घालून फिरतात त्यांच्या विरोधात आहे. जे पत्रकार ब्लॅकमेल करतात, जे बोगस आहेत, पत्रकार संघटना काढून दुकानदारी करतात त्यांच्या विरुद्ध बेरक्या आहे. जे पत्रकार चांगले आहेत, चांगले काम करतात त्याच्या बाजूने बेरक्या आहे.
जे  वरिष्ठ कनिष्ठ कर्मचाऱ्याला त्रास देतात, , जे मालक आपल्या कर्मचाऱ्याचा त्रास करतात त्यांच्या विरुद्ध बेरक्या आहे.बेरक्या अन्यायग्रस्त पत्रकारांची बाजू घेऊन आजपर्यंत लढला आहे.
बेरक्या ब्लॉग आणि फेसबुक पेज चालवणारा अमुक आमुक आहे, अशी चर्चा नेहमीच  केली जाते. पण बेरक्या हा कोणी एकटा व्यक्ती नाही. बेरक्याची टीम आहे. दिल्ली २, मुंबई ४, पुणे ३, मराठवाडा  ५, विदर्भ ३, कोल्हापूर २, कोकण १० अशी अनेक पत्रकारांची टीम आहे. विदेशात एक जण आहे. त्याच बरोबर प्रत्येक चॅनल, वृत्तपत्र मध्ये बेरक्याचे सोर्स आहेत. ते सोर्स बेरक्या कधी जाहीर करीत नाही.
बेरक्याला आलेल्या मेलची चार वेळा खात्री केली जाते, क्रॉस चेक अनेक वेळा केले  जाते,त्यानंतर बातमी अपलोड  केली जाते..
हा खुलासा करण्याचे कारण असे की, काही दुकान मांडून बसलेल्या पत्रकार संघटना आणि कुठेच काम करीत नसलेले त्याचे पादरे -पावटे बेरक्या अमुक अमुक आहे म्हणून सांगत सुटले आहेत. बर आपण सांगा बेरक्या गुन्हेगार आहे का ? बेरक्याने चांगल्या पत्रकारास त्रास दिला का ? असे असेल तर हा ब्लॉग आम्ही आता बंद करतो.
पत्रकार संघटनेच्या नावाखाली सुरु असलेला दुकानाचा बाजार बेरक्याने उठविला, यांचे काळे धंदे उघडकीस आणले, याचा खरा चेहरा समोर आणला म्हणून यांच्या बुडाखाली मोठी आग लागली आहे. कोकणातील अलिबाग मध्ये मनमानसींचा मुका घेवून पुण्यात आलेले पार्सल, त्याचा खास चमचा असलेला परळचा बारावी नापास असलेला दारुडा,सिंधुदुर्गचा एका चॅनलने हाकलून लावलेला ब्लॅकमेलर आणि कोकणातील रोहामध्ये  बूट पॉलिश करीत शेमचे बूट चाटणारा दुसरा चमच्या तर खूप बोंबलत आहे. असे  पादरे- पावटे आम्ही गेली ७ वर्ष कोळून पेली आहेत. पत्रकार संघटना काढून दुकान मांडलेल्या लोकांचा बाजार वेळोवेळी उठवतच  राहू...
बेरक्या अमुक -अमुक आहे असे कोणी सांगितले तर आपण अजिबात विश्वास ठेवू नका.. आपण सारेच बेरके आहोत... चला वाईट प्रवूत्ती ठेचू या ! पत्रकारितेतील घाण साफ करू या !
बेरक्या टीम