लोकमतचे वार्ताहर विश्वास पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा

कोल्हापूर - कोल्हापूर  प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष आणि लोकमतचे मुख्य वार्ताहर विश्वास शामराव पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटी  अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून  पोलिसांनी पाटील यांना अटक केली आहे.   न्यायालयाने पाटील यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सर्जेराव पोवार  (आंबा ता. शाहूवाडी) या दलित युवकाची 17 एकर जमीन हडप करण्यासाठी विश्वास पाटील यांनी त्याला घरातून बाहेर काढून शिवीगाळ करीत मारहाण केली. यापुर्वीही 2015 ला त्यांनी व त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा विश्वास पाटील यांनी असा प्रकार केला होता.
पोवार यांच्या नावावर 7 /12 उतारा असतानाही विश्वास पाटील यांनी जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला.

यापुर्वीही सामना या दैनिकामध्ये बलात्काराचा गुन्हा दखल झाला अशी बातमी आली होती.यावेळी त्यांच्याबाबत माध्यमांमध्ये जोरात चर्चा सुरु होती. मात्र पाटील यांनी राजकीय लोकांच्या मध्यस्थीने ते प्रकरण राजा मकोटे नावाच्या पत्रकारावर शेकवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला लावला.  त्यांच्या अशा कारनाम्यामुळे पाटलांची  सकाळमधून  उचलबांगडी करण्यात  आली  होती.

त्यांच्या कारनाम्याला घाबरुन कोणतेही  दैनिक त्यांना घेण्याचे धाडस करीत नव्हते..  शेवटी एका  खासदाराच्या  मध्यस्थीने दर्डा यांना सांगून लोकमतला ते जॉईन झाले झाले होते.
अॅट्रॉसिटी  अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहूवाडी पोलिसानी  विश्वास शामराव पाटील यास अटक केली. याप्रकरणी दोन दिवसाची कोठडी मिळाली आहे.20 आॅगस्टला लोकमत कोल्हापुरचा वर्धापन दिन आहे, त्यासाठी ते बाहेर येण्यासाठी  प्रयत्नशील आहेत.


काय आहे प्रकरण ?
http://www.spsnews.in/2017/08/14/parivne/