"महाराष्ट्राचं महाचॅनल" मध्ये परिवर्तनाचे वारे

मुंबई - "चला जग जिंकू या ! स्वारी  "महाराष्ट्राचं महाचॅनल" मध्ये नवे संपादक आल्यापासून  परिवर्तनाला सुरुवात झालीय. , नव्या संपादकांनी अनेकांच्या अधिकारावर हातोडा चालवलाय.गेले चार महिने चॅनेलची धुरा संभाळण्याऱ्या आणि प्रकर्षाने   चॅनेलला खड्यात घालणाऱ्या  टोळीला नव्या संपादकांनी तडीपार केलय. तर फर्स्ट पोस्टमधून आईबीएनमध्ये आलेलं पार्सल सुद्धा पहिल्याच फटक्यात परत पाठवलं गेलं.
सत्ता मिळाल्यावर हत्तीसारख्या माजलेल्या माणिक मोतीची आउटपुट विभागप्रमूख या पदावरून हकालपट्टी झाली असून आता माणिक मोतीची बदली इनपुट विभागात करण्यात आली आहे.  सध्या मोतीला शिफ्ट इन्चार्जच्या हाताखाली निमूटपणे काम करावं लागतंय, ज्या सहकाऱ्यांना ऑर्डर द्यायचा,त्यांच्याच हाताखाली काम करण्याची पाळी मोतीवर आली आहे. दुसऱ्या चॅनेल मध्ये माणिक मोतीने खूप हात - पाय मारून बघितले, मात्र त्याचा कपटी इतिहास बघता कुणी त्याला थारा द्यायला तयार नाही.
चॅनल  महिने हातात असतांना या माणिक मोतीने  चॅनेलला   TRP मध्ये पार गाळात नेवून  पोहोचवलय. दुसरीकडे लायकी नसतांना सत्ता मिळाल्यावर गावातल्या वळू सारखा पिसाळलेल्या तोडक - मोडकची हवा आता चांगलीच टाईट झाली आहे. कॉन्फरन्स कॉल मध्ये महिला रिपोर्टसोबत कमरेखालची भाषा वापरल्यामुळे तोडक - मोडक अगोदरच  संकटात सापडलाय, चॅनेलच्या सर्व महिला रिपोर्टनी तोडक मोडक विरुद्ध वरपर्यंत कम्प्लेन्ट ठोकल्यात. तोडक मोडक अनेक रीपोर्टर कडून तोडपाणी करायचा ही  बाब नव्या संपादकापर्यंत अगोदरच पोहोचली होती. म्हणून आल्या - आल्या तोडक मोडकचे पंख छाटण्यात आलेत. त्याला विभागप्रमुख म्हणून काढून टाकण्यात आलाय, आता तो केवळ शिफ्ट ईंचार्ज म्हणून काम करतो.कदाचित माणिक मोती आणि तोडक मोडकला कामावरून काढून टाकण्याचा विचार मॅनेजमेंटचा आहे असं कळतंय.
यस बॉस ,यस बॉस करत चॅनलमध्ये प्रवेश करणारा लबाड लांडगा उर्फ संजय याला मध्येच कार्यकारी संपादक होण्याचे स्वप्न पडायला लागले होते, मात्र आता बॉस गेल्यावर या लबाड लांडग्याला त्याच्या मूळ जागेवर परत धाडण्यात आलाय. चॅनेलचा TRP येवो न येवो मात्र या तिघांवर केलेल्या कारवाईमुळे चॅनेलचे कर्मचारी खूप खुश झालेत.