५१ लाखाकडे वाटचाल

बेरक्या ब्लॉग सुरु होवून सहा  वर्ष पूर्ण झाली ... सातवे वर्ष सुरु आहे. नवीन लूक सुरु होवून पाच वर्ष  झाली... पाच वर्षात नव्या लूकची व्हिजिटर संख्या ४९ लाख ५१ हजार झाली आहे. लवकरच आम्ही ५१ लाखाचा टप्पा पार करू..
बेरक्या ब्लॉगला आपण दिवसातून कितीही वेळाही  भेट द्या,  मात्र एका आयपी ऍड्रेस वरून एकच नंबर काउन्ट होतो... तेही कॉम्पुटर आणि लॅपटॉप वरून वाचल्यास... तसेच मोबाईल वरून वेबसाईट वाचल्यास नंबर काउंट होत नाही... तरी आम्ही ४९ लाख ५१ हजार चा टप्पा पार केला आहे.
बेरक्या ब्लॉग हा पत्रकारितेतील सर्व घटक, पत्रकारिता महाविद्यालयातील विद्यार्थी , चॅनल आणि पेपरचेमालक, संपादक, राजकीय नेते, पोलीस आणि जनता वाचते.. त्याची संख्या लाखोंच्या घरात आहे...
पण याचा आम्हाला कधी गर्व नाही.. आमचे पाय नेहमी जमिनीवर आहेत..

बेरक्यावर जळणारे काही महाभाग असले तरी प्रेम करणारे असंख्य आहेत.. त्यामुळे आम्ही कोणाची पर्वा करीत नाही... दुकान मांडून  दुकानदारी करणाऱ्या पादरे पावटे यांचा नक्कीच आम्ही बिमोड करू...
काहीजण स्वतःला नेता समजतात, मुखवटे घालून फिरतात , त्यांची दुसरी बाजू लोकांना  माहीत नसते,,, ती बाजू बेरक्याला इतंभूत माहिती असते... मोका बघून आम्ही चौका मारतो...
असो, आपले प्रेम असेच असू द्या...
पुन्हा भेटू..
- बेरक्या टीम 
 ......

जाता जाता 

उन्हाळी अधिवेशनात मंजूर झालेला पत्रकार संरक्षण कायदा, पावसाळी अधिवेशन संपले तरी अद्याप जारी झालेला नाही..
यावर राज्यपालांनी अद्याप स्वाक्षरी केलेली नाही आणि जीआर सुद्धा निघालेला नाही...
मात्र स्वयंघोषित पत्रकार नेते पत्रकार संरक्षण कायदा केवळ आणि केवळ माझ्यामुळे मंजूर झाला, असा डांगोरा पिटत फिरले आणि हारतुरे आणि सत्कार स्वीकारून स्वतःला धन्यता मानून घेतले...
त्यांच्या या शेमफुल कृतीचा धिक्कार !
बाबांनो, कायदा मंजूर झाला म्हणजे हल्ला थांबणार आहे का ? स्वतः चे संरक्षण स्वतः करा , कोणाची अपेक्षा न करता आणि कोणाची तळी न उचलता आपले काम प्रामाणिक करा...
मी तुमच्या सोबत आहे ....


- बेरक्या टीम