नागेश खंडागळे यांची आरोटे यांनी घेतली भेट
दैनिक
गांवकरीच्या नाशिक आवृत्तीचे उपसंपादक नागेश खंडागळे हे नाशिक
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सहा दिवसापासून उपोषणास बसले आहेत.
उपोषणस्थळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास
आरोटे भेट देवून भेट खंडागळे यांची बाजू समजावून घेतली. त्यांचा गावकरीने
जवळपास तीन लाख पगार थकवला असल्याची माहिती मिळाली. ती मिळावी यासाठी काय
करता येईल यासाठी आरोटे यांनी खंडागळे यांच्याशी चर्चा केली.
खंडागळे
रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत उभे राहून उपोषण करतात, सायंकाळी
जिल्हाधिकारी यांना निवेदन देतात आणि घरी जातात . त्याचे हे अनोखे आंदोलन
सहा दिवसापासून सुरु आहे.
एकीकडे
शेमची संघटना अमुक करणार , तमुक करणार अशी फेसबुक आणि व्हाट्स अँप वर
नुसत्या घोषणा करते. मात्र आरोटे कोणतेही घोषणा न करता कृती करीत असल्याने
त्यांची संघटना जोर पकडत आहे. खंडागळे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरोटे प्रयत्नशील आहेत.
...................
लोकसत्ताच्या संपादकीय विभागात नाराजी
मुंबई - महाराष्ट्र टाईम्समधून लोकसत्तात गेलेले राजीव काळे यांनी वर्ष पूर्ण व्हायच्या आतच घर वापसी करायचा निर्णय घेतला आहे, तर चीफसब विनय उपासनी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
त्यामुळे लोकसत्ताच्या संपादकीय विभागात नाराजी व अस्वस्थता अाहे.
......