नाशिक - मानबिंदूच्या पेपरच्या नाशिक आवृत्तीच्या संपादकांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने विविध चर्चांना
ऊत आला आहे.
मानबिंदूतर्फे आयोजित करण्यात येणा-या महामॅरेथॉन स्पर्धेची नाशिक
आवृत्तीकडून विशेष तयारी सुरू असताना त्यातच अवघ्या २० दिवसांवर येऊन
ठेपलेल्या मॅरेथॉन स्पर्धेच्या तोंडावर टाईम्सच्या संपादकांनी
दिलेल्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे नाशिकच्या आवृत्तीत गटातटाचे राजकारण
सुरू असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.
आधीच कर्मचारी पुरेशी वेतनवाढ न झाल्याने आणि मानबिंदू ऐवजी दुस-या अन्य कंपनीचे कर्मचारी म्हणून दाखविल्याने कर्मचा-यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली असताना इंग्रजी आवृत्तीच्या संपादकांनी १ जुलै २०१७ पासून कारभार हाती घेतल्यानंतर अवघ्या अडीच महिन्यात दिलेला राजीनामा बराच काही सांगून जाणारा आहे. जुलै महिन्यापासून कार्यभार स्वीकारताना टाईम्स नाशिक आवृत्तीला नवा चेहरा द्यायचा या हेतूने या महाशयांनी अनेक कठोर निर्णय घेतले. जुन्या संपादकांचा अलगद कापलेला पत्ता, आपल्याच मर्जीतले कर्मचारी कायम ठेवून इतरांना घरून बातम्या भाषांतर करून पाठविण्याचा दिलेला अजब सल्ला, शहरातील मध्यवर्ती भागातून आपले कार्यालय मराठी आवृत्तीच्या ग्रामीण भागाचे तसेच प्रिंटिंग युनिट असलेल्या ठिकाणी स्थलांतरित करणे, कर्मचा-यांवर वरच्या आवाजात बोलून धाकात ठेवण्याचा प्रयत्न करणे असा हर प्रकारचा खटाटोप करूनही ह्या महाशयांनी फोनवर राजीनामा देत असल्याचे तसेच उद्यापासून प्रेस लाईन मध्ये माझे नाव यायला नको अशी औरंगाबादस्थित 'भगवान' बालाजींना कळवून यांनी थेट पुणे गाठल्याचे कळते आहे. मॅरेथॉन स्पर्धेनिमित्त गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील एका नामांकीत हॉटेल मध्ये टी शर्ट अनावरण सोहळ्याला आपल्याला का बोलावले गेले नाही ?असा सवाल उपस्थित करत इंग्रजी आवृत्तीच्या महाशयांनी बाबूजींना अलविदा केले आहे.
टी शर्ट अनावरण सोहळ्यास शहरातील बडे प्रस्थ असलेल्या मान्यवरांसह क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यास कार्यालयातील सर्वच विभागातील प्रमुखांना बोलविण्यात आले होते. अनावरण सोहळ्याची वेळ जवळ येऊ लागताच विभागप्रमुखांनी इंग्रजी महाशयांसमोर आपल्या वाहनांना सेल मारत तळ ठोकला आणि इंग्रजी महाशयांना बरोब्बर कार्यक्रमापासून दूर ठेवण्याची खेळी यशस्वी करून दाखवली. रात्रीच्यावेळी सर्वकाही झाल्यानंतर कार्यक्रमाचा फोटो छापण्याची वेळ येते तेव्हा मात्र या फोटोकडे बघत इंग्रजी आवृत्ती महाशयांची तळपायाची आग थेट मस्तकात जाते आणि या अनोख्या राजीनामानाट्याला सुरुवात होते. स्वतःच्या वेगळ्याच तो-यात जगणा-या समूहाच्या प्रत्येक इव्हेंट मध्ये उसना भाव खाऊन जाणा-या सहाय्यक उपाध्यक्षाने अशी खेळी का खेळली ?, मराठी आवृत्तीच्या संपादकाला साजेसे व्यक्तिमत्व नसताना, आठवड्यातून एकदा लेख प्रसिद्ध होणा-या तसेच या लेखासाठी आठवडाभराच्या सर्वच पेपरच्या फाईल चाळून, आपल्या पदापेक्षा खालच्या पातळीतील परंतु आपल्यापेक्षा त्याची बौद्धिक पातळी जास्त असल्याने या आठवडाभराच्या लेखासाठी वरिष्ठ उपसंपादकाकडून टिप्स घेत प्रसंगी आपला लेख त्याच्याकडून फायनल करून घेत असलेल्या निवासी संपादकाला मात्र फुकट मिरवले जात असल्याने इंग्रजी टाइम्सचे कर्मचारी आश्चर्य व्यक्त करत आहेत.