परब, मुंडे यांची टीव्ही ९ मध्ये एंट्री

मुंबई -  टीव्ही ९ ( मराठी ) मध्ये इनपुट हेड  म्हणून  सचिन परब तर आऊटपुट  हेड म्हणून माणिक मुंडे जॉईन झाले असून  "नवा गडी, नवा राज"  सुरु झाला आहे.
सचिन परब हे न्यूज एक्प्रेस  नंतर मुंबई लाइव्ह या वेब पोर्टलला कार्यरत होते. त्यांची टीव्ही ९ मध्ये न्यूज एडिटर तथा इनपुट हेड नियुक्ती करण्यात आली आहे.
माणिक मुंडे हे एबीपी माझा , सामनंतर  IBN लोकमतला आऊटपुट हेड म्हणून कार्यरत होते. तेथे नव्या संपादकांनी आऊटपुट हेड पद  काढून इनपुटला हाताखाली ठेवल्याने मुंडे नाराज होते. अखेर त्यांनी IBN लोकमतचा राजीनामा देणे पसंद केले. टीव्ही ९ मध्ये आऊटपुट  हेड म्हणून माणिक मुंडे जॉईन झाल्यामुळे पूर्वीचे हेड गजानन कदम यांची खाट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.