मराठी पत्रकार परिषदेवर प्रशासक ! एस.एम.देशमुख स्वयंघोषित अध्यक्ष !!

पुणे - मराठी पत्रकार परिषदेवर सन 2008 पासून प्रशासक नियुक्त असून,एस.एम.देशमुख आणि त्यांचे पंटर हे स्वयंघोषित अध्यक्ष आणि पदाधिकारी असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेवून मराठी पत्रकार परिषदेची सर्व  बँक खाती सिल करावी तसेच त्यांच्या अधिस्वीकृती समितीवरील नियुक्या रद्द कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषदेची सन 1972 मध्ये पुण्याच्या न्यास नोंदणी कार्यालयात नोंद झाली असून,त्याचा नोंदणी क्रमांक एफ 568 आहे.पहिले अध्यक्ष म्हणून वसंत काणे ( पुणे ) यांची नोेंद आहे.त्यानंतर सन 2006 सोलापूरच्या एम.डी.शेख यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद नावाची समांतर संघटना काढून ही संघटना बळकावण्याचा प्रयत्न केला.तशी परिशिष्ठ "अ " वर नोंद आहे.मात्र सन 2008 मध्ये एम.डी.शेख यांची न्यायालयाच्या आदेशावरून निवड रद्द करण्यात आली आणि धर्मादाय सहआयुक्त यांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आली.मात्र प्रशासक उठल्याची किंवा निवडणुका घेण्याचा आदेश असल्याची कसलीही माहिती न्यास नोंदणी कार्यालयात उपलब्ध नाही तसेच सन 2008 पासून कोणताही चेंज रिपोर्ट दाखल नाही.
असे असताना एस.एम.देशमुख आणि त्यांच्या पंटरनी  मराठी पत्रकार परिषदेवर बेकायदेशीर कब्जा करून ही संघटना ताब्यात घेतली आहे.तसेच एक नव्हे तीन बँक खाते परिषदेच्या नावावर काढली आहेत.इतकेच काय तर सन 2010 पासून न्यास नोंदणी कार्यालयात ऑडिट रिपोेर्ट दाखल नाही.मराठी पत्रकार परिषदेवर आजही प्रशासक नियुक्ती असून,एम.एम.देशमुख यांनी प्रशासक उठल्याचे किंवा निवडणुका घेण्याचा न्यायालयाचा  आदेश असल्याची प्रत जगजाहीर करावी,असे आव्हान परिषदेशी निगडीत असलेल्या सदस्यांनी दिले आहे.

स्वयंघोषित अध्यक्ष

एस.एम.देशमुख हे मराठी परिषदेचे स्वयंघोषित अध्यक्ष असून,त्यांचे सर्व पंटर स्वयंघोषित पदाधिकारी आहेत.त्यांनी पत्रकारांची मोठी फसवणूक केली असूून,त्यांच्यावर राज्य सरकारने कडक कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.
मराठी पत्रकार परिषदेची सर्व बँक खाती सिल करण्यात यावीत तसेच एस.एम.देशमुख आणि त्यांच्या पंटरच्या अधिस्वीकृती समितीवर करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात यावी,अशी मागणी होत आहे.