देशोन्नतीच्या आकोट वार्ताहराला महिलेने सर्वांसमक्ष दिला चपलांचा प्रसाद

निवडणूक विभागाच्या व्हिडीओ मध्ये सर्व प्रकार कैद ?
 
अकोट--दैनिक देशोन्नतीचा आकोट येथील वार्ताहर चंद्रकांत श्रीराम पालखडे याला आकोट शहर पोलिसांनी मुंडगाव येथील एका महिलेच्या तक्रारीवरून विनयभंग व ऑट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक केली आहे.
घटनेची हकीकत अशी की तक्रारकर्ती महिला ही सुल्तानपूर पो. मुंडगाव येथील रहिवाशी असून वणी गट ग्राम पंचायतच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत अनुसूचित जातिकरिता राखीव असलेल्या सरपंच पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परवा त्या अर्जाच्या छाननीचा कार्यक्रम सुरू होता,त्यादरम्यान चंद्रकांत पालखडे हा त्याठिकाणी आला व दारात उभे राहून शुक शुक करून हातवारे व हावभाव करू लागला.
त्याचा हा प्रकार सहन न झाल्यामुळे व त्याच्या हातवाऱ्या मागील भावना लक्षात येताच दारात जाऊन त्याच्या कानाखाली थप्पड लगावली व घाबरून आपल्या पतीला बाहेर येऊन शोधू लागली तेव्हढ्यात पुन्हा पालखडे त्याठिकाणी आला व  मी तुझ्या उमेदवारी अर्जातील सर्व त्रुटी दूर करतो व अर्ज कायम ठेवतो त्यासाठी तू संध्याकाळी माझ्या घरी ये असे म्हटले, त्याच्या बोलण्याचा मला त्यावेळी राग आल्यामुळे मी त्याला पायातील चप्पल काढून मारले.
वरील सर्व प्रकार हा तहसील कार्यालयाच्या आवारात घडला आहे,असे कथन करून पुढे म्हटले आहे की ती महिला त्याच दिवशी आकोट शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी निघाली परंतु पालखंडे व त्याच्या पत्नीने पोलीस स्टेशन जवळच तिला गाठून तक्रार न देण्या विषयी हातपाय जोडले व पुन्हा असे काही होणार नाही असे सांगितले.त्यावेळी तेथून ती महिला परत गेली परंतु रात्री गावात गेल्यानंतर पालखडेने तिच्या चारित्र्याचे हनन होईल अशा प्रकारच्या चर्चा केल्या,पालखंडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम असून त्याच्या वर बलात्कार,फसवणूक विनयभंग व लोकांच्या शेतातील पिकांना आग लावून नुकसान करणे असे विविध गुन्हे दाखल आहेत.त्याच्यापासून जीविताला  काही त्रास होऊ शकतो म्हणून आज आकोट शहर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देण्याचा निर्णय घेतला .
आकोट शहर पोलिसांनी सदरहू महिलेच्या तक्रारी वरून चंद्रकांत पालखडे विरुद्ध गु.र.न.351/2017 भादवीचे कलम 354(अ)(ड)506 व सहकलम अनुसूचित जाती ,जमाती अत्त्याचार प्रतिबंधक सुधारणा कायदा 2015चे कलम 3(1)w(II),R नुसार गुन्हा दाखल केला असून पालखडे याला अटक करण्यात आली असून  पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे व ठाणेदार गजानन शेळके हे करीत आहेत.
     अशा प्रवृत्तीच्या वार्ताहर,पत्रकारांमुळे अकोल्यातील इमानदारीने पत्रकारिता करणारे लोक मात्र नाहक बदनाम होत असून जिल्ह्यातील वृत्तपत्र व्यवस्थापणानी वार्ताहर नियुक्त करताना त्याची चारित्र्य पडताळणी करण्याची मागणी जिल्ह्यातील अनेक पत्रकार व ग्रामीण भागातील वार्ताहर यानिमित्ताने करीत आहेत.

दरम्यान चंद्रकांत श्रीराम पालखडे याची दैनिक देशोन्नतीने हकालपट्टी केली आहे.