IBN लोकमतचा ABP माझा वर 'डोळा' !

मुंबई - टीआरपीमध्ये क्रमांक तीनवरून चारवर  गेलेल्या IBN लोकमतचा  ABP माझावर  चांगलाच 'डोळा' दिसतोय !  पुन्हा किमान तीनवर येण्यासाठी चांगले न्यूज अँकर भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी असलेल्या ABP माझाच्या तीन स्टार अँकरला बेस्ट ऑफर देण्यात आली.लॉबिंगला कंटाळलेल्या विलास बडेने तात्काळ होकार देत, ABP माझाचा राजीनामा दिला. रात्री १० च्या बातम्यांचा जुना जानता अँकरने होकार दिला असून राजीनामा दिल्याची  चर्चा आहे. मात्र एका लेडी अँकरने 'नम्र'पणे नकार दिला.
अनेक वर्ष नंबर वनवर राहिलेला ABP माझा आता दोनवर गेला आहे. त्यात काही स्टार अँकर सोडून जात असल्याने खांडेकरांचे धाबे दणाणले आहेत. चॅनलमध्ये काही विशिष्ठ  लोकांची  लॉबिंग सुरु आहे.. त्यात नव्या  लोकांची माती होत आहे.पूर्वी एकसंघ असलेला चॅनल आता गटबाजीने ग्रासला आहे.

चॅनलचे नाव एक ऑक्टोंबरला बदलणार
IBN लोकमतचे नाव आता 'न्यूज १८ लोकमत' होणार आहे. हा बदल १ ऑक्टोंबरपासून होणार आहे, केवळ आठ दिवस शिल्लक असताना अजून कसलीही जाहिरात नाही किंवा नवा प्रोमो नाही. नव्या संपादकांना नेमके काय करावे, हेच समजेनासे झाले आहे.

स्वदेशी ड्रेस कपाटात धूळ खात  पडले !
संघाच्या मुशीत तयार झालेल्या नव्या संपादकांनी महिलांनी अँकरिंग करताना स्लिव्हलेस ड्रेस घालायचा नाही असा फतवा काढला तसेच सर्व अँकरनी स्वदेशी कपडे वापरायचे असा निर्णय घेतला. हा निर्णय मुंबईत परस्पर घेण्यात आला, त्यानुसार सर्व अँकरचे मोजमाप घेऊन स्वदेशी कपड्यांचे ड्रेस शिवण्यात आले. ते आलेही पण दिल्लीवाल्यानी असे परस्पर करण्यास झापझाप झापले आणि कोणी सांगितला असा शहाणपणा ! असे खडे बोल सुनावले, मग काय स्वदेशी ड्रेस  कपाटात धूळ खात पडले असून खर्च अंगलट आला आहे. आता सर्व अँकरला हे ड्रेस दिवाळी भेट मिळणार का ? अशी कुत्सीत चर्चा सुरु झाली आहे.
संतापाची बाब म्हणजे कोणत्या लेडी अँकरकडे घरी कोणत्या रंगाच्या साड्या आहेत, हे ग्रुपवर टाकण्याचे फर्मान काढण्यात आले होते,काही महिलांनी ते टाकतेही ! पण स्वदेशी  प्लन अंगलट आला आहे.

आदरणीय / श्रीमती
चॅनलमध्ये नवे संपादक आल्यापासून 'आदरणीय / श्रीमती' हे दोन शब्द परवलीचे झाले आहेत. चहा आणणाऱ्या शिपायाला सुद्धा ' अहो आदरणीय, चहा आणता का ? हे वाक्य कानी पडत असल्याने सर्वजण हसून लोटपोट झाले आहेत. महिलांना 'श्रीमती ' हा शब्द वापरला जात असल्याने महिलाहि  चांगल्याच हिरमुसल्या आहेत. मध्यतंरी वजन, उंची मोजून वजन कमी करण्याचे सांगण्यात आले, त्यावरून चांगलाच गदारोळ झाला.
ग्रुपवर कसल्याही सूचना पडत असल्याने सर्वजण हैराण झाले आहेत.रात्री दोन वाजता घरी गेलेल्या एका अँकरला सकाळी आठ वाजता, अहो आदरणीय उठा, हा व्हायरल झालेला  मेसेज चांगलाच गाजला !
कन्टेन्ट पेक्षा अश्या फालतू गोष्टीवर लक्ष सुरु असल्याने चॅनल अजून खड्ड्यात जात आहे.

माणिक मोतीला एचआरची पाचर
माणिक मोतीने राजीनामा दिला खरा पण त्याचा राजीनामा किमान तीन महिने  मंजूर करायचा नाही अशी पाचर एचआरने मारली आहे. त्यामुळे चॅनल सोडायचे असेल तर माणिक मोतीला तीन महिन्याचा पगार द्यावा लागेल. राजीनामा मंजूर न झाल्याने टीव्ही ९ मध्ये माणिक मोती जॉईन होवू शकला नाही.
माणिक मोती बद्दल पाच महिलांनी विविध गँभीर तक्रारी केल्याने एचआरने चांगलीच पाचर मारल्याचे कळते ! उस्मानाबादी रिपोर्टरच्या शिफारशीनुसार 'फणस' ने माणिक मोतीला घेतले खरे पण 'फणस' जाताच माणिक मोती वेगळ्या गोष्टीत गुंतला ! आणि स्वतःची माती करून घेतला !
......