दिनेश हारे, आप्पासाहेब गोरे आदर्श गावकरीमध्ये जॉईन

औरंगाबाद - आदर्श बँकेचे अध्यक्ष अंबादास मानकापे - पाटील यांच्या "आदर्श गावकरी" मध्ये निवासी संपादक म्हणून दिनेश हारे तर वरिष्ठ महाव्यवस्थापक म्हणून आप्पासाहेब गोरे जॉईन झाले असून, गावकरीची जुनी टीम पुन्हा गोळा होत आहे.
औरंगाबादेत 'गावकरी' पासून वेगळा होवून 'आदर्श गावकरी' सुरु झाल्यानंतर जनरल मॅनेजर म्हणून महावीर देवसाळे आणि कार्यकारी संपादक म्हणून अभय निकाळजे यांनी धुरा सांभाळली होती. पण मालक अंबादास मानकापे - पाटील यांनी या दोघांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पुन्हा जुनी टीम पाचारण केली आहे. निवासी संपादक म्हणून दिनेश हारे तर वरिष्ठ महाव्यवस्थापक म्हणून आप्पासाहेब गोरे हे नुकतेच जॉईन झाले आहेत तर महावीर देवसाळे आणि अभय निकाळजे यांना नारळ देण्याची तयारी सुरु आहे.
मुख्य संपादक म्हणून डॉ अनिल फळे यांना  मनधरणी  सुरु असून डॉ .फळे जॉइन होणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.