सुशील कुलकर्णी यांचा एकमतला रामराम

औरंगाबाद - सुशील कुलकर्णी यांनी अखेर एकमतचा राजीनामा दिलाय. खरं तर कुलकर्णी यांनी दोन महिन्यापूर्वीच राजीनामा दिला होता,  पण त्याची अधिकृत घोषणा त्यांनी काल फेसबुकवर केली आहे.
सुशील कुलकर्णी आणि आर. टी . कुलकर्णी या जोडगोळीने एकमतची औरंगाबाद आवृत्ती रिलॉन्चिंग केली होती.त्यांनी  अनेकांना दुसरा पेपर सोडायला भाग पडून एकमतमध्ये आणले होते, पण अवघ्या एक वर्षांतच एकमतचा डोलारा ढासळला आहे. कर्मचाऱ्याच्या गेल्या तीन महिन्यापासून पगारी नाहीत.त्यात सुशील कुलकर्णी आणि आर टी कुलकर्णी यांनी राजीनामा दिलाय. त्यामुळे ६० ते ६५ कर्मचाऱ्याचे नुकसान झाले आहे. संपादकीय विभागातील काही कर्मचारी वगळता अनेकांनी  जॉब सोडला आहे. आता फक्त टाळे लावणे बाकी आहे.
एक तर औरंगाबाद आवृत्ती बंद करणे किंवा  पूर्वीप्रमाणे लातूरहुन अंक पाठवून आपले अस्तित्व कायम ठेवणे यावर सध्या विचार सुरु आहे. औरंगाबाद आवृत्तीच्या रिलॉन्चिंगमुले मालक अमित देशमुख यांना किमान दोन ते अडीच कोटी रुपयाला फटका बसल्याची चर्चा आहे.

सुशील कुलकर्णी फेसबुक लाइव्ह