मुंबई-
राज्य सरकारने काल 14 नोव्हेंबर रोजी एक जीआर काढून राज्य पातळीवरील
शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी समिती घोषीत केली. यात
राज्यातील सात पत्रकारांचा समावेश असून ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.
पत्रकारांना
दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मात मृत्यू झाल्यास त्यांना किंवा
त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या
शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या विश्वस्त
संस्थेवर राज्यातील सात पत्रकारांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात
आली आहे.
त्यात संदीप
प्रधान (दै. लोकमत मुंबई), संदीप आचार्य (दै. लोकसत्ता मुंबई), जयप्रकाश
पवार (दै. दिव्य मराठी, नाशिक), अशोक चिंचोले (दै. भूकंप लातूर), राहूल
पांडे (दै. हितवाद नागपूर), गजानन जानभोर (दै. लोकमत नागपूर) व अनिरूद्ध
पांडे (दै. तरूण भारत यवतमाळ) यांचा समावेश आहे.
या
समितीवर शासकीय सदस्य म्हणून प्रधान सचिव माहिती व जनसंपर्क विभाग
मंत्रालय मुंबई हे अध्यक्ष राहणार असून महासंचालक माहिती व जनसंपर्क
महासंचालनालय मुंबई सदस्य, संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) महासंचालनालय
मुंबई सदस्य सचिव, उपसंचालक (लेखा) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबई
खजिनदार तर उपसचिव/ सहसचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुुंबई हे
सदस्य राहणार आहेत.