औरंगाबाद -तारीख पे तारीख करीत मराठवाड्यात अखेर पुढारी दाखल झाला, मात्र पुढरीत आता गळती सुरू झाली आहे. वितरण व्यवस्थापक
अनिल सावंत यांनी नुकताच राजीनामा दिला असून व्यवस्थापनाने तो मंजूर केला केला आहे.
अनिल सावंत हे औरंगाबाद पुढारीचे पहिले कर्मचारी होते.त्यांनी पुढारी ऑफिस,प्रेस,उभारणी पासून काम केले.पुढारी ची तारीख निश्चित होत नसल्याने त्यांनी दिव्य मराठी जॉईन केले होते.पुढारीचा मुहूर्त निश्चित होताच त्यांना पुन्हा पुढरीत घेण्यात आले होते. पद्मश्रीचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती.मात्र व्यवस्थापक पांडे आणि सावंत यांच्यात नेहमीच खटके उडत होते. पांडेनी सावंत यांच्यावर कुरघोडी करण्यासठी लोकमत मधून निवृत्त झालेले शेदाणे यांना मुख्य वितरण व्यवस्थापक म्हणून डोक्यावर बसविल्याने सावंत नाराज झाले. पांडे यांच्या या खेळीला कंटाळून अखेर सावंत यांनी पुढारीला रामराम ठोकला आहे.
औरंगाबाद पुढारीचा खप 35 हजारावरून 16 हजारावर आला आहे. वर्षभरात औरंगाबाद आवृत्तीची ABC 59 हजार एव्हडी झाली होती, मात्र लोकमत मधून आलेल्या शेदाणे यांनी पदभार स्वीकारून एक महिना झाला. खपाचा आकडा वाढण्या ऐवजी दिवसेंदिवस घसरत चालला आहे आणि तो निम्यावर आला आहे.पांडेच्या पांडेगिरीमुळे संपादकीय विभागातही खटके उडत आहेत. सावंतप्रमाणेच विनोद विरोधात ही मोठा गेम रचला गेला होता.मात्र कोल्हापूरात विनोद यशस्वी झाला आणि पांडेचा गेम फसला.मात्र यात एका फोटो ग्राफर काम सोडावे लागले आहे. आधीच चांगली माणसे मिळत नाहीत.आहे ती टिकत नाहीत .या मुळे मराठवाड्यात पुढारी वाढतो की पडतो अशी अवस्था निर्माण झाली आहे.